पत्रकाराच्या आंदोलनानंतर एमआयडीसीच्या पुलावर खड्डे बुजविण्यास सुरवात

लक्ष्मण डुबे 
शुक्रवार, 24 ऑगस्ट 2018

पाताळगंगा औद्योगिक क्षेत्राला जोडणाऱ्या पराडे ते श्री सिध्देश्वरी या मुख्य रस्त्यावरील पाताळगंगा नदीवरील पुलावर खड्डे पडुन दुरावास्था झाली आहे. जाताना वाहन चालाकांचे हाल होत होते. तर खड्डे बुजविण्यात यावेत अशी मागणी कारखानदारांनी आणि इतर संस्थांनी केली होती.

रसायनी (रायगड) - पाताळगंगा नदीवरील एमआयडीसीच्या पुलावर खड्डे पडून दुरावस्था झाली होती. त्यामुळे येथून जातायेता नागरिकांचे होत होते. तर खड्डे बुजविण्याच्या कामाकडे एमआयडीसी दुर्लक्ष करत असल्याने पत्रकार आनंद पवार यांनी बुधवार (ता. 22 ऑगस्ट) पुलावरील खड्डयात बसुन आंदोलन केले.

या आंदोलनाला रसायनी प्रेस क्लब व खालापुर तालुका प्रेस क्लब तसेच परिसरातील सर्व राजकीय पक्षांनी पाठींबा दिला. दरम्यान एमआयडीसीने काल गुरुवार (ता. 23) ला पासुन खड्डे बुजविण्याचे काम सुरू केल्याने नागरिकांनी समाधान व्यक्त केले आहे. 

पाताळगंगा औद्योगिक क्षेत्राला जोडणाऱ्या पराडे ते श्री सिध्देश्वरी या मुख्य रस्त्यावरील पाताळगंगा नदीवरील पुलावर खड्डे पडून दुरावस्था झाली आहे. जाताना वाहन चालाकांचे हाल होत होते. तर खड्डे बुजविण्यात यावेत अशी मागणी कारखानदारांनी आणि इतर संस्थांनी केली होती. मात्र एमआयडीसीने याकडे दुर्लक्ष करत असल्याने नागरिक तिव्र संताप व्यक्त करत होते.

दरम्यान बुधवारी आंदोलन केले आणि एमआयडीसीच्या आधिकाऱ्यांनी यावेळी गणपति उत्सवापुर्वी खड्डे बुजविण्याचे आश्वासन दिले होते. तर एमआयडीसीने गुरुवार पासुन खड्डे बुजविण्याचे काम सुरू केले आहे. एक मोठ्या खड्डयात सिमेंट काँक्रीट केले असल्याचे सांगण्यात आले आहे. तर एमआयडीसीने आंदोलना नंतर दुसऱ्या दिवशीच काम सुरू केल्याने तरी नागरिकांनी समाधान व्यक्त केले आहे. 

पाताळगंगा नदी वरील एमआयडीसीच्या पुलावर खड्डे बुजविण्याचे काल पासुन सुरू केले आहे. पावसामुळे कामात आडथळा आला नाही तर लवकरात लवकर काम पुर्ण करण्याचे आमचे प्रयत्न आहेत. - जितेंद्र जाधव, अभियंता,
पाताळगंगा, एमआयडीसी 
 

Web Title: The construction of the road on MIDC bridge started