पानशिल आदिवासी वाडीतील शौचालयांचे बांधकाम रखडले

लक्ष्मण डुबे 
गुरुवार, 6 डिसेंबर 2018

रसायनी (रायगड) - वासांबे मोहोपाडा ग्रामपंचायतीच्या हद्दितील पानशिल आदिवासी वाडीतील आदिवासी बांधवाचे शौचालयांचे बांधकाम रखडले असल्याने आदिवासी बाधवांची गैरसोय होत आहे. तर ग्रामपंचायतीने  समस्याकडे लक्ष्य घालावे आशी मागणी येथील आदिवासी बांधवानी केली आहे. 

मुंबई पुणे द्रुतगती महामार्गावरील ग्रामपंचायतीच्या हद्दीतील खोड्यातील विस्थापित या पानशिल आदिवासी वाडीत ऐकोणीस कुंटूबाचे पुर्वसन केले आहे. स्वच्छताचे महत्व लक्षात घेऊन ग्रामपंचायतीने आदिवासीसाठीचा ग्रामपंचायतीचा निधि व सरकारी योजना त्यापैकी सुमारे पंधरा लाभार्थीचे शौचालयांचे बांधकाम सुरू करण्यात आले आहे.  मात्र दोन वर्षासुन बांधकाम रखडले आहे. साधारण तीन महिन्यापुर्वी चौकट, भांडे ही किरकोळ काम केली आणि पुन्हा काम रखडले आहे. अजुन  दरवाजे, टाक्यांना झाकण बसविणे आदी काम बाकी आहे. असे सांगण्यात आले आहे. रखडलेले बांधकाम लवकरात लवकर पुर्ण करावे आशी मागणी आदिवासी बांधवानी केली आहे. 

पानशिल वाडीतील सुमारे पंधरा लाभार्थीचे शौचालय बांधण्याचे काम देण्यात आले आहे. काम का थांबवले आहे. या बाबत चौकशी करू तसेच काम सुरू करण्यासाठी ग्रामपंचायत प्रशासन विचार  विनिमय करेल.  काम सुरू करण्यासाठी प्रयत्न केले जातील. 
दत्तात्रेय शिंदे, उपसरपंच, वासांबे मोहोपाडा, ग्रामपंचायत

Web Title: The construction of toilets in Panashil tribal wadi ceased