मुंबई गोवा महामार्गावर सुकेळी खिंडीत बंद पडला कंटेनर

अमित गवळे
गुरुवार, 12 जुलै 2018

सुकेळी खिंडित वारंवर अवजड वाहने बंद पडतात. त्यामुळे येथे सातत्याने वाहतुक कोंडी होत असते.

पाली (जि. रायगड) - मुंबई गोवा महामार्गावर सुकेळी खिंडीत गुरुवारी (ता. 12) एक कंटेनर रस्त्यात बंद पडला होता. यामुळे वाहतुकीस अडथळा येत होता.

खांब गावाच्या बाजुकडे जातांना उतारावर हा कंटेनर बंद पडला आहे. यामूळे स्कुल बससह इतर वाहनांना येथून मार्ग काढतांना अडथळे येत होत्या. सुकेळी खिंडित वारंवर अवजड वाहने बंद पडतात. त्यामुळे येथे सातत्याने वाहतुक कोंडी होत असते. त्यातच सुकेळी खिंडीत अाता भले मोठे खड्डे पडले अाहेत. कदाचित यातीलच एका मोठ्या खड्ड्यात अादळून हा कंटेनर बंद पडला असण्याची शक्यता आहे.

आपण एका क्लिकवर ताजे अपडेट्स आपल्या मोबाईलमध्येही मिळवू शकता.

Web Title: Container stoped at Sukeli on Mumbai Goa highway