गोव्यात मगो पक्षात वाद

अवित बगळे
गुरुवार, 14 जून 2018

पणजी - गोव्यातील सर्वात जूना राजकीय पक्ष असलेल्या महाराष्ट्रवादी गोमंतक पक्षात (मगो) वाद सुरु झाले आहेत. फोंडा पालिका निवडणुकीत पक्षविरोधी कारवाया केल्यामुळे पक्षाचे सरचिटणीस, माजी आमदार लवू मामलेदार यांची पक्षातून हाकालपट्टी करण्याच्या हालचाली सुरु झाल्या आहेत. पक्षाचे अध्यक्ष दीपक ढवळीकर यांनीही मामलेदार यांच्याविरोधात आपल्याकडे तक्रारी आल्याचे सांगितले आहे.

अलीकडेच मामलेदार यांनी पत्रकार परीषद घेऊन ढवळीकर यांच्यावर एकाधिकारशाहीचे आरोप केले होते. मनोहर पर्रीकर यांच्या नेतृत्वाखालील आघाडी सरकारला मगो पक्षाचा पाठिंबा देताना तसा निर्णय पक्षाच्या मध्यवर्ती समितीत घेतलाच गेला नव्हता असा गौप्यस्फोट मामलेदार यांनी केला होता.

तेव्हापासून त्यांच्यासह कधीतरी कारवाई होणार हे ठरून गेलेले होते. आता त्यादिशेने हालचाली सुरु झाल्या आहेत. मडकई, प्रियोळ विधानसभा मतदारसंघात मामलेदार हे पक्षविरोधी कारवाया करत असल्याच्याही तक्रारी आहेत.

Web Title: Controversy in Goa