सावंतवाडीच्या पाणी प्रश्नावरून नगरपालिका मासिक बैठकीत वाद...

Controversy water issue of Sawantwadi in Municipality
Controversy water issue of Sawantwadi in Municipality

सावंतवाडी - शहरातील पाणी प्रश्नावरून नगरपालिका मासिक बैठकीत सत्ताधारी विरोधकांमध्ये जोरदार खडाजंगी झाली. विरोधी नगरसेवक सुरेंद्र बांदेकर यांनी सायंकाळी सहा वाजता येणारे पाणी आता उशिराने का येते ? यामागे कुठे पाणीचोरी किंवा अनधिकृतपणे पाणी वापरले जाते का ? याची चौकशी व्हावी असा प्रश्न उपस्थित केला असता सत्ताधार्‍यांरी आक्रमक झाले गेल्या तीन वर्षापासुन पाणीप्रश्न गंभीर झाला असताना दोन महिन्यात मार्ग काढायला आमच्याकडे जादूची कांडी आहे का ? कुठेही पाणी चोरले जात नाही पण काही टेक्निकल प्रॉब्लेम असल्यास ते आम्ही नक्कीच दुर करू असे उत्तर पाणी सभापती नासीर शेख यांनी दिले, एकूणच या प्रश्नावर दोन्हीकडून आरोप प्रत्यारोप होतांना पाणीप्रश्न चांगलाच पेटला.

सावंतवाडी नगरपालिकेचे नाशिक सभा उपनगराध्यक्ष अन्नपूर्णा कोरगावकर यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली या बैठकीमध्ये विविध विकास कामाबाबत चर्चा झाली यातून 32 कामांना चर्चेअंती सर्वानुमते मंजुरी देण्यात आली, यामध्ये वृक्ष प्राधिकरण समिती पुनर्गठित करण्याबाबत झालेल्या चर्चेत विरोधी गटाच्या गटनेत्या अनारोजीन लोबो यांनी जोरदार विरोध केला तीन वर्षापूर्वी गठीत करण्यात आलेली समिती पाच वर्ष रद्द करता येत नाही असे त्यांनी सांगितले. तर सत्ता बदलानंतर नवीन अध्यक्षांना कायद्यानुसार यात अधिकार आहे. त्या लोकांचे कार्यक्षमता व व अभ्यासू लोकांचे परीक्षण करून ही समिती पुनर्गठित करता येते असे सत्ताधारी नगरसेवक ऍड नासिर शेख यांनी सांगितले मात्र यावर एकमत न झाल्याने विरोधकांचा विरोध नोंदवून या विषयावर पडदा टाकण्यात आला.

आयत्या वेळी आलेल्या पाणी प्रश्नावरून सत्ताधारी व विरोधकांमध्ये चांगलीच जुंपली, नगरसेवक सुरेंद्र बांदेकर यांनी पाण्याबाबत प्रश्न उपस्थित करताना गेल्या दोन महिन्यात पाण्याच्या बाबतीत गंभीर प्रश्न निर्माण झाला असल्याचे सांगून ग्राहकांना कनेक्शन देताना पाऊण इंच वर्धा इंच पाईप द्वारे कनेक्शन देतो. मात्र कोणत्याही नळ ग्राहकाला मीटिंग शिवाय कनेक्शन देता येतात असा सवाल उपस्थित केला. यावेळी जोरदार आरोप प्रत्यारोप झाले. सभा अध्यक्षांनाही दोन्ही गटांना शांत करण्यात नाकीनऊ आले, मात्र समयसुचकता राखत अध्यक्षांनी पाणी प्रश्नावरच चर्चेतुन तोडगा काढूया असे सूचित करत सर्वाना शांत राहण्याचे आवाहन केले.
 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com