समन्वयातून साधणार विकास - संतोष साटविलकर

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 11 एप्रिल 2017

मालवण - जिल्ह्याचा समन्वय साधून विकासकामांना प्राधान्य दिले जाणार आहे. शासनाकडून उपलब्ध होणारा निधी जास्तीतजास्त तालुक्‍यास उपलब्ध करून दिला जाईल. तालुक्‍याला झुकते माप देताना जिल्ह्यातील अन्य तालुक्‍यांनाही न्याय दिला जाईल, अशी ग्वाही जिल्हा परिषदेचे नवनिर्वाचित बांधकाम सभापती संतोष साटविलकर यांनी आज येथे दिली. 

जिल्हा परिषदेच्या वित्त व बांधकाम सभापतिपदी निवड झाल्यानंतर आज प्रथमच संतोष साटविलकर यांनी येथील पंचायत समितीस भेट दिली. या वेळी सभापती मनीषा वराडकर, उपसभापती अशोक बागवे, गटविकास अधिकारी राजेंद्र पराडकर, काँग्रेसचे तालुकाध्यक्ष मंदार केणी यांच्या हस्ते त्यांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत करण्यात आले. या वेळी पंचायत समिती सदस्य कमलाकर गावडे, गोळवण उपसरपंच सुभाष लाड, कोळंब सरपंच सुनील मलये, कांदळगाव सरपंच बाबू राणे, बांधकामचे अधिकारी आर. जे. कोकाटे यांच्यासह अन्य अधिकारी, पदाधिकारी उपस्थित होते.  

तालुक्‍यात जिल्हा परिषद बांधकाम विभागाच्या अखत्यारित येणाऱ्या ९६२ किलोमीटर लांबीच्या ग्रामीण रस्त्यांपैकी अनेक रस्ते खड्डेमय व नादुरुस्त आहेत. या रस्त्यांच्या दुरुस्तीसाठी ९ कोटी खर्चाचा आराखडा जिल्हा परिषद बांधकाम विभागाकडे पाठवला आहे. यापैकी पहिल्या टप्प्यात केवळ ३५ लाख निधी मंजूर झाला. तरी आराखड्यातील जास्तीत जास्त निधी उपलब्ध करून द्यावा, अशी मागणी जिल्हा परिषद बांधकाम विभागाचे अधिकारी श्री. कोकाटे यांनी श्री. साटविलकर यांच्याकडे केली.  

या वेळी सभापती साटविलकर यांनी सर्व विभागांचा आढावा घेतला. बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांसमवेत तालुक्‍यातील विविध विकासकामांवर चर्चा केली. तालुक्‍यातील विकासकामांचा आराखडा तयार करण्याच्या सूचनाही त्यांनी या वेळी दिल्या.

Web Title: coordinate with development