esakal | खवय्ये काढणार कोरोनाचा "काटा"
sakal

बोलून बातमी शोधा

corona the demand increase of meat and fish market because in ratnagiri

कोरोना काळात आपली रोगप्रतिकारक शक्ती वाढविण्यासाठी हा निर्णय घेतला आहे

खवय्ये काढणार कोरोनाचा "काटा"

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

चिपळूण : कोरोना काळात रोगप्रतिकारक शक्ती वाढावी, यासाठी प्रथिनेयुक्त आहार करण्याचा सल्ला अंमलात आणण्यासाठी अनेकांनी श्रावणातील मांसाहार बंदीवर पाणी सोडले आहे. रोजच्या जेवणात अंडी सेवन करण्याबरोबरच चिकन, मटण, मासळीयुक्त आहाराकडेही नागरिकांचा कल कायम आहे. त्यामुळे गेल्या काही वर्षांच्या तुलनेत यंदा श्रावण महिना सुरू असतानाही व्यवसायात फारशी घट नसल्याचे विक्रेत्यांचे म्हणणे आहे.

हेही वाचा - होम क्‍वारंटाईन असूनही गोव्याला जाणे पडले महागात..

यंदा कोरोनाचा प्रादुर्भाव कायम असल्याने अनेकांनी श्रावणावर पाणी सोडले. कोरोना काळात आपली रोगप्रतिकारक शक्ती वाढविण्यासाठी हा निर्णय घेतला आहे, असे ग्राहक सांगत आहेत. शहरात रविवार, बुधवार आणि शुक्रवारी मासळी बाजार तसेच मटण-चिकण, मासळीला मागणी कायम आहे. त्यातही अधिक प्रथिने देणाऱ्या चिकन ब्रेस्टला अधिक मागणी असल्याचे चिकन विक्रेते मुजम्मिल पालकर यांनी सांगितले.

श्रावणात मागणी घटल्याने कोंबडी तसेच अंड्यांच्या दरात घसरण होते. मात्र, यंदा ती परिस्थिती नाही. सध्या चिपळूणात ब्रॉयलर कोंबडी २०० रुपये प्रतिकिलो दराने विकली जात आहे. तर, अंडे प्रतिनग पाच रुपयांनी विकले जात आहे. ग्राहकांकडून मागणी कायम असल्याने दरही कमी झाले नसल्याचे विक्रेते मुनीर सुर्वे यांनी सांगितले. 

हेही वाचा - मालवणातील समस्यांवर भाजपचे बोट, फडणवीसांना मागण्यांचे निवेदन...

"मी सलग १५ वर्षे श्रावणात मांसाहाराचे सेवन करीत नाही. यंदा कोरोना काळात प्रथिनेयुक्त आहार नियमित मिळावा, यासाठी मांसाहार सुरू आहे. याशिवाय, घरातून काम असल्याने व्यायामाला अधिक वेळ मिळत आहे. काही व्यायामासाठी असा आहार पोषक ठरतो."

- संतोष चव्हाण, ग्राहक

"मांसाहारामुळे नागरिकांना प्रथिने मिळतात. त्यातही अंड्यांमध्ये उत्तम प्रथिने असतात. त्याबरोबरच जीवनसत्त्वेही शरीराला आवश्‍यक आहेत. त्यामुळे नागरिकांनी मांसाहाराबरोबर हिरव्या पालेभाज्याही खाव्यात."

- डॉ. अल्ताफ सरगुरोह, चिपळूण

संपादन - स्नेहल कदम 

loading image
go to top