सावधान : सावंतवाडी तालुक्यात वाढतोय कोरोनाचा आलेख...

Corona graph is growing in Sawantwadi taluka
Corona graph is growing in Sawantwadi taluka

सावंतवाडी - येथील तालुक्यात कोरोनाबाधित रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत असून आलेल्या नवीन अहवालामध्ये तालुक्यातील ओटवणे येथील एक व चौकूळ येथील एक असे आणखी 2 व्यक्ती कोरोनाबाधित असल्याचे स्पष्ट झाले. त्यामुळे रुग्णांची संख्या 13 वर पोहोचली आहे.

येथील तालुक्यात ओटवणे येथे सापडलेला रुग्ण मुंबई घाटकोपर मधून आला होता. त्याला गावातच संस्थात्मक विलगीकरण कक्षात दाखल करण्यात आले होते. तर चौकूळ येथे दोन दिवसांपूर्वी सापडलेल्य रुग्णा सोबत विलगीकरण कक्षात असलेल्या अन्य लोकांचे अहवाल तपासणीसाठी पाठविण्यात आले होते. त्यातील एक जण कोरोना अबाधित असल्याचा अहवाल प्राप्त झाला आहे.
ओटवणे गावात रुग्ण आढळून आल्यानंतर याबाबत प्रशासनाने त्वरित योग्य ते पाऊल उचलत त्याला ओरोस जिल्हा रुग्णालयात दाखल केले आहे. हा रुग्ण मुंबई घाटकोपर येथून २६ मे आला होता. गावामध्ये त्याला संस्थात्मक विलगीकरण कक्षात काॅरन्टाईन करण्यात आले होते. २ ला त्याचा घसा खवखवू लागल्याने  येथील उपजिल्हा रुग्णालयात त्याची कोरोना  टेस्ट घेण्यात आली.  त्यानंतर त्याला सावंतवाडी येथे  संस्थात्मक विलगीकरण कक्षात काॅरन्टाईन करण्यात आले होते. आज त्याचा कोरोना रिपोर्ट पॉझिटिव्ह आला. त्यानंतर गुरुवारी त्याला तातडीने सावंतवाडीतून जिल्हा रुग्णालयात कोविड कक्षात उपचारासाठी नेण्यात आले आहे. तर त्याच्यासोबत ओटवणे येथील शाळेत विलगीकरण कक्षात असलेल्या अन्य तिघांनाही जिल्हा रुग्णालयात तपासणीसाठी नेण्यात आले आहे. त्यातील एक जण कोरोना बाधित सापडलेल्या रुग्णासोबत एकाच खोलीत राहत होता त्यामुळे भीती निर्माण झाली आहे.

तर चौकूळ येथे कोरोना बाधित अहवाल प्राप्त झालेला रुग्ण चार दिवसांपूर्वी 31 मेस मुंबई येथून आपल्या कुटुंबातील पत्नी व 2 मुलींसह चौकूळ येथे आला होता. त्यानंतर त्याला चौकुळ येथील एका शाळेत विलगीकरण कक्षात ठेवण्यात आले होते. याच शाळेतील एका व्यक्तीचा अहवाल दोन दिवसांपूर्वी पॉझिटीव्ह आल्यानंतर शाळेतील एकिकरण कक्षात असलेल्या सर्वांचे अहवाल तपासणीसाठी पाठविण्यात आले होते. तर या रुग्णालाही ताप आल्याने 2 जूनला येथील उपजिल्हा रुग्णालयातील क्वारंटाईन उपचार कक्षात दाखल करण्यात आले. त्यानंतर तातदिंड त्याला ओरोस येथील जिल्हा रुग्णालयात हलविण्यात आले. त्याचा  तपासणी साठी पाठविण्यात आलेला अहवाल आज प्राप्त झाला असून मुंबईतून आलेली ही व्यक्ती कोरोना बाधीत निघाली आहे. त्याच्या सोबत मुंबई हुन आलेली त्याची पत्नी व 2 मुली या शाळेतच संस्थात्मक क्वारंटाईन असल्याची माहिती चौकुळ सरपंच रिता गावडे यांनी दिली.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com