सिंधुदुर्ग जिल्ह्यात कोरोना वाढतोय

0
0

ओरोस (जि. सिंधुदुर्ग) : कोरोनाचा प्रादुर्भाव नव्याने वाढत आहे. त्या पार्श्‍वभूमीवर जिल्ह्यात कोविड-19च्या चाचण्यांचे प्रमाण वाढवावे. कोरोना रुग्णांच्या संपर्कात आलेल्यांचा शोध घेण्यावरही भर द्यावा, अशा सूचना जिल्हाधिकारी के. मंजुलक्ष्मी यांनी मंगळवारी येथे दिल्या. जिल्हाधिकारी कार्यालयात झालेल्या बैठकीत त्या बोलत होत्या. 

मुख्य कार्यकारी अधिकारी प्रजित नायर, जिल्हा पोलिस अधीक्षक राजेंद्र दाभाडे, निवासी उपजिल्हाधिकारी शुभांगी साठे, अतिरिक्त जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. श्रीपाद पाटील, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. महेश खलिपे, प्रांत सुशांत खांडेकर, वंदना खरमाळे, वैशाली राजमाने यांच्यासह सर्व तालुका आरोग्य अधिकारी, वैद्यकीय अधीक्षक, पोलिस अधिकारी व संबंधित सर्व अधिकारी उपस्थित होते. 

कोविड केअर सेंटर सुरू करण्याच्या सूचना देऊन के. मंजुलक्ष्मी म्हणाल्या, ""जास्तीत जास्त वेळ लसीकरण सुरू राहील, या दृष्टीने नियोजन करावे. लसीविषयीचे गैरसमज दूर करून जास्तीत जास्त लोक लसीकरणासाठी येतील, यासाठी प्रयत्न करावेत. प्रत्येक प्राथमिक आरोग्य केंद्र स्तरावर स्वॅब घेण्याचे नियोजन करावे. गृहअलगीकरणात असताना रुग्ण नियमांचे पालन करत नसेल तर त्यास थेट संस्थात्मक अलगीकरणात ठेवावे. त्यासाठी शासकीय संस्थात्मक अलगीकरण केंद्रांची संख्या वाढवा. शासकीय संस्था अधिग्रहित करा. कोविड सेंटरसाठी जागा निश्‍चित करा. आरटीपीसीआर चाचण्यांवर अधिक भर द्या. कोरोनामुळे आतापर्यंत झालेल्या मृत्यूचे ऑडिट करा. कोविड सेंटरच्या दृष्टीने खासगी रुग्णालयांचा आढावा घ्या. एप्रिल व मेमधील सुट्या, होळी आणि आंबा व काजूची वाहतूक सुरू होणार आहे, त्या दृष्टीने नियोजन करा.'' 

राजेंद्र दाभाडे यांनी आरोग्य व महसूल विभागास सर्व मदत करण्यास पोलिस दल सज्ज आहे, असे सांगितले. त्यांनी पोलिस विभागाच्या लसीकरणाचीही माहिती यावेळी दिली. 
 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com