esakal | रत्नागिरीत आज 50 नवे पॉझिटिव्ह रुग्ण ; आणखी एका डॉक्‍टर बाधित 
sakal

बोलून बातमी शोधा

corona infection to doctor in ratnagiri

कोरोनामुळे मृत्यू होण्याच्या प्रमाणातही वाढ होऊ लागली आहे. दोन दिवसांपूर्वी तिघांचा मृत्यू झाला होता.

रत्नागिरीत आज 50 नवे पॉझिटिव्ह रुग्ण ; आणखी एका डॉक्‍टर बाधित 

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

रत्नागिरी : जिल्हा रुग्णालयात कोरोनाने आज आणखी तिघांचा मृत्यू झाला. यामुळे जिल्ह्यातील मृतांची संख्या 71 झाली आहे. गुरुवारी (ता. 6) रात्री उशिरा मिळालेल्या अहवालानुसार 50 नवे कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण सापडले आहेत. दरम्यान 75 रुग्णांना बरे झाल्यानंतर घरी सोडण्यात आले. यामुळे बरे झालेल्या रुग्णांची संख्या 1 हजार 446 झाली आहे. पॉझिटिव्ह आलेल्यांमध्ये आणखी एका डॉक्‍टरचा समावेश आहे. एका पत्रकाराच्या घरात कोरोना शिरला आहे. 

कोरोनामुळे मृत्यू होण्याच्या प्रमाणातही वाढ होऊ लागली आहे. दोन दिवसांपूर्वी तिघांचा मृत्यू झाला होता. आज आणखी 3 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाल्याने नागरिकांमध्ये भीती वाढत चालली आहे. आज राजापूर तालुक्‍यातील नाटे गावातील 60 वर्षीय महिला रुग्ण, तसेच पाचल येथील एक महिला रुग्ण आणि राजिवडा (रत्नागिरी) येथील एक 60 वर्षीय पुरुष रुग्णाचा मृतांमध्ये समावेश आहे. 

जिल्ह्यात 50 नवीन कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळले असून यात रत्नागिरी- 14, कामथे- 10, कळंबणी- 19, दापोली- 2, देवरूख- 1, ऍन्टीजेन टेस्ट 4 आदींचा समावेश आहे. आज सापडलेल्यांमध्ये चिपळूण- 1, निवळी- 1, कुवारबाव- 1, थिबापॅलेस- 1, नाचणे गोडाऊन स्टॉप- 1, कर्ला- 1, गोळप- 1, मांजरे- 1, पालघर- 1, जयगड- 1, राधाकृष्ण टॉकीजजवळ- 1, सन्मित्रनगर- 3, करबुडे एक आदींचा आहे. 
आज 75 रुग्णांनी कोरोनावर मात केली. यामुळे बरे झालेल्या रुग्णांची संख्या 1 हजार 446 झाली आहे. 

हे पण वाचा...त्यामुळे आता विनापास रत्नगिरीत प्रवेश करता येणार नाही

 जिल्ह्यात सध्या 258 ऍक्‍टीव्ह कन्टेन्मेंट झोन आहे. संस्थात्मक विलगीकरणात कक्षामध्ये 139 संशयित कोरोना रुग्ण दाखल आहेत. आज अखेर होम क्वारंटाईन खाली असणाऱ्यांची संख्या 33 हजार 041 इतकी आहे. परराज्यातून व अन्य जिल्ह्यातून जिल्ह्यात अखेर 2 लाख 52 हजार 302 व्यक्ती दाखल झाल्या. 

* एकूण तपासलेले नमुने -19 हजार 298 
* तपासणी अहवाल प्राप्त झालले -18 हजार 845 
* पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या -2066 
* निगेटिव्ह रुग्ण -16 हजार 767 
* प्रलंबित अहवाल - 453 
* बरे झालेले रुग्ण - 1446 
* एकूण मृत्यू - 71 
* ऍक्‍टीव्ह पॉझिटिव्ह - 549 


संपादन- धनाजी सुर्वे 

loading image