esakal | रत्नागिरीतील 'हा' तालुका ठरतोय कोरोनाचा हॉटस्पॉट
sakal

बोलून बातमी शोधा

corona positive cases are increased in ratnagiri

तालुक्यात कोरोनाचे तब्बल 35 रुग्ण सापडले आहेत.

रत्नागिरीतील 'हा' तालुका ठरतोय कोरोनाचा हॉटस्पॉट

sakal_logo
By
राजेश शेळके

रत्नागिरी : रत्नागिरी तालुका सध्या कोरोनाचा हॉटस्पॉट ठरू लागला आहे. जिल्ह्यातील इतर तालुक्याच्या तुलनेत रत्नागिरी जास्त रुग्ण सापडत आहेत. आज प्राप्त झालेल्या अहवालांमध्ये एकट्या रत्नागिरी तालुक्यात कोरोनाचे तब्बल 35 रुग्ण सापडले आहेत. यापैकी रत्नागिरी शहरात 10 तर कारवांचीवाडी वाडी येथे 7 पॉझिटिव्ह रुग्ण असल्याने नागरिकांची चिंता वाढली आहे.

काल रात्री प्राप्त झालेल्या अहवालानुसार जिल्ह्यात नवे 85 पॉझिटिव्ह रुग्ण सापडले. यापैकी एकट्या रत्नागिरी तालुक्यात 35 पॉझिटिव्ह रुग्ण सापडले आहेत. या पॉझिटिव्ह रुग्णांमध्ये सर्वाधिक 7 रुग्ण कारवांचीवाडी येथील आहेत. यामध्ये कोकण नगर येथील 3 आणि लक्ष्मी चौक गाडीतळ येथील 4 पॉझिटिव्ह रुग्णांचा समावेश आहे.

हेही वाचा -  रत्नागिरीत तब्बल इतक्या कोटींच्या विकास आराखड्याला कात्री... 

याशिवाय पूर्णगड येथे 2 रुग्ण सापडले आहेत. शांतीनगर, कापडगाव, कुवारबाव, साखरपा भडकंबा, आंबेशेत, पोलिस स्टेशन रत्नागिरी, गोडबोले स्टॉप, थिबा पॅलेस, हर्णे, जयगड, तेली आळी, देवुड, राजापूर (ऍडमिट), भाट्ये, दापोली (ऍडमिट) आणि कासारवेली येथे नवे रुग्ण आढळून आले आहेत. तालुक्यात कोरोनामुळे मरण पावलेल्यांची संख्याहूी सर्वाधिक आहे. जिल्हा रुग्णालयात कोरोनाने काल 3 जणांचा मृत्यू झाला. यामुळे जिल्ह्यातील मृतांची संख्या 71 झाली आहे.

हेही वाचा -  आम्ही दलाल नाही तर शेतकरी आहोत, कोकणच्या विकासासाठी नाणार आवश्यकच...

तालुकानिहाय मृतांची आकडेवारी 
रत्नागिरी - 19
खेड - 6
गुहागर - 2
दापोली - 14
चिपळूण - 13
संगमेश्वर - 7
लांजा - 2
राजापूर - 7
मंडणगड  - 1  

संपादन - स्नेहल कदम               

loading image
go to top