esakal | या गावाने सूचनांचे केले काटेकोर पालन मात्र , अखेर त्याने केला शिरकाव...
sakal

बोलून बातमी शोधा

Corona should not come to the village so the people of Anjanvel strictly followed both lockdowns but

घरोघरी औषधे वाटली. तरीदेखील जुलैअखेर  अंजनवेलचा पत्ता शोधून काढलाच

या गावाने सूचनांचे केले काटेकोर पालन मात्र , अखेर त्याने केला शिरकाव...

sakal_logo
By
अर्चना बनगे

गुहागर (रत्नागिरी) : अंजनवेल गावाने आजपर्यंत कोरोनाचा गावात प्रवेश रोखला होता. त्यासाठी ग्रामस्थ कोरोनासंदर्भातील जनजागृती, संक्रमण होऊ नये म्हणून केलेल्या मार्गदर्शन सूचनांचे काटेकोरपणे पालन करत होते; मात्र आज एका ग्रामस्थाला लागण झाली. हे समजल्यावर गावातील बाजारपेठ व ग्रामपंचायत संकुलही बंद केले आहे; मात्र त्या व्यक्तीच्या अहवालाबाबत संभ्रम आहे.


आपल्या गावात कोरोना येऊ नये, म्हणून अंजनवेलवासीयांनी दोन्ही लॉकडाउन तंतोतंत पाळले. मार्गदर्शक सूचनांची अंमलबजावणी केली. घरोघरी औषधे वाटली. तरीदेखील जुलैअखेर कोरोनाने अंजनवेलचा पत्ता शोधून काढला आहे; मात्र आलेल्या अहवालाने थोडासा संभ्रमही निर्माण झाला. या गावातील एका ग्रामस्थाला कोरोनाची लक्षणे दिसू लागली. त्यामुळे या व्यक्तीचा स्वॅब ग्रामीण रुग्णालय, गुहागर येथे घेण्यात आला होता. त्यानंतर ही व्यक्ती रत्नागिरीत पोचली.

हेही वाचा- सभापती विशाखा लाड यांनी प्रशासनाला दिले आदेश : या आठ शिक्षकांवर होणार  कडक कारवाई  का वाचा... -

जिल्हा रुग्णालयानेही या व्यक्तीचा स्वॅब तपासणीसाठी पाठविला. एकाच व्यक्तीच्या दोन स्वॅबपैकी रत्नागिरीतील स्वॅबचा रिपोर्ट पॉझिटिव्ह आला तर गुहागरमधून पाठवलेल्या स्वॅबचा रिपोर्ट अजून मिळालेला नाही. तसेच रत्नागिरीच्या रिपोर्टमधील आयडी आणि वय गुहागरमधील स्वॅबच्या तपशीलाशी जुळत नाहीत. त्यामुळे ही व्यक्ती कोरोनाग्रस्त आहे वा नाही, याबाबत संभ्रम आहे.

हेही वाचा- सावंतवाडी पाठोपाठ बांदा शहरातही कोरोनाचा शिरकाव :  त्या युवकाचा कोरोना अहवाल पॉझिटीव्ह... -

सावधानता म्हणून जिल्हा शासकीय रुग्णालयाचा अहवाल ग्राह्य मानून आरोग्य विभागाने कामाला सुरवात केली आहे. अंजनवेलमधील बाजारपेठ बंद केली आहे. या व्यक्तीच्या संपर्कातील व्यक्तींचा शोध सुरू आहे. अंजनवेल ग्रामपंचायत संकुलामध्ये पोस्ट, तलाठी कार्यालय, बॅंक, उपाहारगृह अशा अन्य आस्थापना आहेत. या सर्व आस्थापनादेखील बंद आहेत.

हेही वाचा-पंचायत समिती उपसभापतींची घरासमोरील मोटार मध्यरात्रीत फोडली....घडले कुठे वाचा -

संक्रमण कसे झाले?
संबंधित कोरोना संशयित व्यक्ती आणि त्याच्या घरातील कुटुंबीय मार्च महिन्यापासून गावाबाहेर गेलेले नाहीत. त्यामुळे लक्षणे न दिसणाऱ्या पॉझिटिव्ह व्यक्तीशी त्यांचा गावातच संपर्क झाला असावा, असा अंदाज बांधण्यात येत आहे. लक्षणे न दिसणाऱ्या पॉझिटिव्ह व्यक्तीचा शोध घेण्याचे आव्हान आरोग्य विभागासमोर आहे.

loading image
go to top