रत्नागिरीत नियम धाब्यावर; जीवनावश्‍यक वस्तू खरेदीच्या नावाखाली गर्दी

नागरिकांनी नियम पाळण्याची गरज; संचारबंदी कायदा धाब्यावर
रत्नागिरीत नियम धाब्यावर; जीवनावश्‍यक वस्तू खरेदीच्या नावाखाली गर्दी

रत्नागिरी : कोरोना संसर्गाची (covid-19) साखळी तोडण्यासाठी जिल्ह्यात (ratnagiri district) संचारबंदी (lockdown) आदेश लागू केला आहे. मात्र गेल्या चार दिवसांपासून ज्या प्रमाणे जिल्ह्यातील प्रमुख शहरे आणि परिसरात नागरिकांची (citizen) गर्दी दिसत आहे. यावरून संचारबंदी कायदा धाब्यावर बसविला जात असल्याचे चित्र आहे. संचारबंदीच्या काळात जास्त रुग्ण वाढले आहेत. मग ही कसली संचारबंदी, असा सवाल आता नागरिक उपस्थित करू लागले आहेत. त्यामुळे संचारबंदीच्या आदेशाच्या (order) अंमलबजवाणीकडे बोट दाखविले जात आहे.

जिल्ह्यात कोरोनाच्या दुसऱ्या लाटेने थैमान घातले आहे. बाधितांची (corona positive) संख्या कमी होण्याचे नाव घेईल. वारंवार होणाऱ्या गर्दीमुळे कोरोना संसर्ग वाढत आहे. हा संसर्ग रोखण्यासाठी जिल्ह्यात संचारबंदी लागू करण्यात आली आहे. संचारबंदीमध्ये सकाळी 7 ते 11 या दरम्यान जीवनावश्‍यक वस्तू खरेदीसाठी सवलत दिली. परंतु या सवलतीचा गैरफायदा घेतला जात असल्यानेच दिसत आहे. संचारबंदी म्हणजे विनाकारण कोणीही घरातून बाहेर पडायचे नाही. मात्र गेल्या चार ते सहा दिवसांपासून संचारबंदी कायदाच नागरिकांनी धाब्यावर बसविल्याचे चित्र आहे.

रत्नागिरीत नियम धाब्यावर; जीवनावश्‍यक वस्तू खरेदीच्या नावाखाली गर्दी
'ठाकरे सरकारसह मंत्र्यांना लपायला जागा मिळणार नाही'

जीवनावश्‍यक (immergency service) वस्तू सोडून सुद्धा अन्य खरेदीसाठी नागरिक घराबाहेर पडत आहेत. शहरातील दुकाने बंद आहेत. तरीही नागरिक बाहेर पडत आहेत. काही दुकानदार मागल्या दाराने वस्तू विकत असल्याचीही चर्चा आहे. जेव्हापासून संचारबंदी लागू केली आहे, तेव्हापासून बाधितांची संख्या कमी येण्याऐवजी वाढताना दिसत आहे. संचारबंदीची कडक अंमलबजवाणी झाली तरच वाढती रुग्णसंख्या रोखणे शक्‍यत आहे. मुख्य बाजारपेठ, गोखले नाका येथील आंबा खरेदीसाठी होणारी गर्दी, वाहनांची नेहमीची वर्दळ अजूनही सुरू आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com