कोरोनामुळे फ्रोजन निर्यातीला बसणार मोठा फटका...

corona virus in india impact in Fish exports kokan marathi news
corona virus in india impact in Fish exports kokan marathi news

रत्नागिरी : कोरोनामुळे दोन महिन्यांत कोकण किनारपट्टीतून मासे निर्यात सुमारे ३० टक्‍क्‍यांनी घटेल. त्यामुळे मासे निर्यातीला २००० कोटींचा फटका बसण्याची भीती व्यक्त होत आहे. सध्या निर्यातीवर परिणाम सुरू झाला असून हा फटका मोठा असेल, असा अंदाज रत्नागिरीतील गद्रे मरीन एक्‍स्पोर्टचे मॅनेजिंग डायरेक्‍टर अर्जुन गद्रे यांनी वर्तविला आहे.

भारतातून चीनमध्ये निर्यात केल्या जाणाऱ्या फ्रोजन माशांवर याचा मोठा परिणाम होणार आहे. मुंबई वगळता कोकणातून १५ ते १६ हजार टन तर संपूर्ण महाराष्ट्रातून सुमारे ६० हजार टन माशांची निर्यात होते. 

 परदेशात ईतका टन  निर्यात होतो मासा
चीनमध्ये थैमान घातलेल्या कोरोनाचा जगाने धसका घेतला आहे. कोरोना टाळण्यासाठी समुद्री पदार्थ खाऊ नयेत अशा सूचना दिल्या जात आहेत. कोरोनाचे विषाणू कुठूनही येऊ शकतात, त्यामुळे सध्या सतर्कता बाळगली जात आहे. त्यामुळे माशांपासून तयार केलेले रेडी टू इट सारख्या पदार्थांच्या ऑर्डर नव्याने कुठलाही देश स्वीकारण्यास तयार नाही. राणी माशाच्या लगद्यापासून सुरमी तयार केली जाते. रत्नागिरीसाठी याचे मोठे मार्केट जपान, अमेरिका, इटली आणि युरोप देशात आहे. एका वर्षात २० हजार टन जपान, इटली ६५०० टन, अमेरिका ५ हजार टन फ्रोजन मासा निर्यात होतो.

कोरोनामुळे  बैठका झाल्या रद्द

मार्चपासून पुढील तीन महिने माशांपासून बनवलेले खाद्यपदार्थ कुठल्या देशात किती प्रमाणात लागणार आहेत त्याची बोलणी सुरु होती. मात्र सध्या कोरोना या व्हायरसने डोके वर काढल्यामुळे खाद्यपदार्थ विकत घेण्याची बोलणी करायला कुठलाच देश पुढे आलेला नाही. माशापासून बनवलेल्या खाद्यपदार्थांच्या ऑर्डर संदर्भातील बैठका रद्द दोन वेळा रद्‌द झालेल्या आहेत. पुढील काही महिने या बैठका होतील अशी शक्‍यता नाही. १० ते १२ टक्के नुकसान आत्ताच झाले असून आणखी तीन महिन्यानंतर कोरोनाचा प्रभाव किती राहील यावर अंदाज बांधावा लागेल.

वर्षाला १५ हजार टन फ्रोजन  चीनला निर्यात
माशापासून तयार केलेल्या खाद्यपदार्थांच्या निर्यातीची अवस्था बिकट आहे. जवळपास ५० टक्‍क्‍याहून जास्त फ्रोजन मासा चीनला निर्यात होतो. गुजरात, मुंबई आणि कोचीनच्या बंदरातून चीनला ही निर्यात होते. पण चीनमध्ये कोरोनाचा प्रादुर्भाव झाला. महाराष्ट्रातून मुंबई बंदरातून वर्षाला १५ हजार टन फ्रोजन मासा चीनला निर्यात होते. चीनमधील बंदरेच बंद असल्यामुळे फ्रोजन माशांच्या निर्यातीवर ३० टक्‍क्‍याहून अधिक परिणाम येत्या दोन महिन्यात होऊ शकतो. 

निसर्गापाठोपाठ कोरोनाचे संकट
महाराष्ट्राला ७२० किलोमीटर लांबीचा समुद्रकिनारा लाभला आहे. बांगडा, सुरमई, बळा, म्हाकुळ आणि कोळंबी या माशांची निर्यात सर्वाधिक होते. निसर्गाच्या लहरीपणामुळे आधीच संकटात सापडलेला मत्स्य व्यवसाय सध्या कोरोनासारख्या महारोगाच्या विळख्यात सापडला आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com