69 सक्रिय, 104 अहवालांची प्रतिक्षा अन् सर्वाधिक कंटेन्मेंट झोन..कुठे? वाचा...

coronavirus impact kankavli sindhudurg district
coronavirus impact kankavli sindhudurg district

ओरोस (सिंधुदुर्ग) - जिल्ह्यात सध्या 22 कंटेन्मेंट झोन सक्रिय असून यात कणकवली तालुक्‍यात 17 झोन आहेत. वैभववाडी 2, मालवण 2 आणि कुडाळ तालुक्‍यात एक झोन सक्रिय आहेत. जिल्ह्यात सध्या कोरोनाचे 69 सक्रिय रुग्ण आहेत. तर 29 संशयित रुग्ण उपचार घेत आहेत. 104 नमुने अहवाल प्रलंबित आहेत. 

जिल्ह्यात काल (ता.1) रात्री उशिरा 12 बाधित मिळाले. यात कणकवली तालुक्‍यात तरेळे येथील चार, लोरे नं 1 येथील 1, कासार्डे येथील 1, वाघेरी येथील 2, देवगड तालुक्‍यातील गावठणवाडी एक, कुडाळ तालुक्‍यातील पिंगुळी येथील 3 रुग्णांचा समावेश आहे. त्यामुळे जिल्ह्यातील रुग्ण संख्या 228 झाली आहे. यातील 154 व्यक्ती डिस्चार्ज घेवून घरी परतले आहेत. 5 व्यक्तीचे निधन झाले आहे. एक व्यक्ती मुंबई येथे गेली आहे. त्यामुळे जिल्ह्यात सध्या सक्रिय रुग्ण 69 राहिले आहेत. 

जिल्ह्यात नव्याने 122 कोरोना नमूने घेतल्याने 3 हजार 967 कोरोना नमूने आतापर्यंत घेतले आहेत. यातील 3 हजार 863 अहवाल प्राप्त झाले आहेत. यातील 3 हजार 635 अहवाल निगेटिव्ह आहेत. आयसोलेशन कक्षात 17 रुग्ण वाढल्याने 97 झाली आहे. डेडिकेटेड कोविड रुग्णालय असलेल्या जिल्हा रुग्णालयात 35 बाधित आणि 28 कोरोना संशयित उपचार घेत आहेत. डेडिकेटेड कोविड हेल्थ सेंटर मध्ये 23 कोरोना बाधित आणि 1 संशयित उपचार घेत आहेत. कोविड केअर सेंटरमध्ये 10 बाधित उपचार घेत आहेत. 

जिल्ह्यातील 4 हजार 85 व्यक्तीची आरोग्य तपासणी आज केली. संस्थात्मक क्वारंटाईनमधील 585 व्यक्ती घरी गेल्याने 16 हजार 313 व्यक्ती येथे दाखल आहेत. शासकीय संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये नव्याने 41 व्यक्ती दाखल झाल्या. त्यामुळे येथील संख्या 65 झाली आहे. गाव पातळीवरील संस्थात्मक क्वारंटाईनमधील 584 व्यक्ती घरी परतल्या. परिणामी 14 हजार 452 व्यक्ती शिल्लक राहिल्या आहेत. नव्याने 984 व्यक्ती जिल्ह्यात दाखल झाल्याने 2 मेपासून जिल्ह्यात दाखल झालेल्या नागरिकांची संख्या एक लाख 20 हजार 857 झाली आहे. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com