सिंधुदुर्गात कोरोनाचे आणखी 9 रूग्ण 

coronavirus impact konkan sindhudurg
coronavirus impact konkan sindhudurg

ओरोस (सिंधुदुर्ग) - जिल्ह्यात आज नवीन 9 कोरोना रुग्ण मिळाले आहेत. 13 रुग्णानी कोरोनावर मात केली आहे. 168 रुग्ण उपचाराखाली राहिले आहेत. यातील 5 रुग्णाची प्रकृती चिंताजनक बनली आहे. 

जिल्ह्यात आतापर्यंत एकूण 6 हजार 499 रुग्ण मिळाले आहेत. यातील 6 हजार 151 रुग्णानी कोरोनावर मात केली आहे. 174 रुग्णाचे निधन झाले आहे. परिणामी 168 रुग्ण सक्रीय राहिले आहेत. यातील 6 रुग्ण जिल्ह्याबाहेर जावून उपचार घेत आहेत. उर्वरित 162 रुग्णावर जिल्ह्यातील कोविड हॉस्पिटल अथवा होम आयसोलेशनमध्ये उपचार सुरु आहेत, अशी माहिती जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. श्रीमंत चव्हाण यांनी दिली. 168 रुग्ण सक्रिय असून त्यापैकी 5 रुग्णाची प्रकृती चिंताजनक आहे.

यातील चार रुग्ण ऑक्‍सीजनवर तर एक रुग्ण व्हेन्टीलेटरवर उपचार घेत आहे. जिल्ह्याबाहेर जावून सहा रुग्ण उपचार घेत आहेत. आरटीपीसीआर टेस्टमध्ये 36 हजार 743 नमुने तपासण्यात आले. यातील 4 हजार 485 नमुने पॉझिटिव्ह आले आहेत. आज नव्याने 94 नमूने घेण्यात आले. ऍन्टिजन टेस्टमध्ये एकूण 26 हजार 600 नमुने तपासले. पैकी 2 हजार 131 नमुने पॉझिटिव्ह आले आहेत. आज नवीन 113 नमूने घेण्यात आले. आतापर्यंत एकूण 63 हजार 343 नमूने तपासण्यात आले. 

तालुका निहाय पॉजिटीव्ह रुग्ण (कंसात मृत्यूचा आकडा) ः देवगड 453 (11), दोडामार्ग 363 (5), कणकवली 1992 (45), कुडाळ 1459 (33), मालवण 599 (18), सावंतवाडी 853 (43), वैभववाडी 191 (8), वेंगुर्ले 561, (10) जिल्ह्याबाहेरील रुग्ण 28 (1). तालुका निहाय सक्रीय रुग्ण ः देवगड-14, दोडामार्ग-8, कणकवली-44, कुडाळ-37, मालवण-18, सावंतवाडी-20, वैभववाडी-8, वेंगुर्ले-9 व जिल्ह्याबाहेरील 10 अशाप्रकारे आहेत. 

संपादन - राहुल पाटील

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com