esakal | माणुसकी धर्मापलीकडे : रिपोर्ट निगेटिव्ह अंत्यसंस्कार करण्यास कुटुंबीयांनी दिला नकार , शेवटी मुस्लिम बांधवांनी केला अंत्यविधी...
sakal

बोलून बातमी शोधा

coronavirus impact story in ratnagiri  kokan  Sankalp Unique Foundation The Muslim brothers cremated the body

संकल्प युनिक फाउंडेशनने जात-धर्म बाजूला ठेवून माणुसकी हाच मोठा धर्म असल्याचे दाखवून दिले..

माणुसकी धर्मापलीकडे : रिपोर्ट निगेटिव्ह अंत्यसंस्कार करण्यास कुटुंबीयांनी दिला नकार , शेवटी मुस्लिम बांधवांनी केला अंत्यविधी...

sakal_logo
By
राजेश शेळके

रत्नागिरी :  कोरोनामुळे नातेवाइकाला खांदा देणे दूरच लोक मृतदेहाकडे ढुंकूनही पाहत नाहीत. खेड येथील एका व्यक्तीबाबत ती कोरोनाबाधित नसतानाही असा विदारक अनुभव आला. अशावेळी रत्नागिरीच्या संकल्प युनिक फाउंडेशनने जात-धर्म बाजूला ठेवून माणुसकी हाच मोठा धर्म असल्याचे दाखवून दिले. जवळचे नातेवाईक येणे शक्‍य न झाल्याने हतबल मुलगा व आईचे सांत्वन करीत हिंदू परंपरेनुसार मुस्लिम बांधवांनी मृतदेहावर अंत्यसंस्कार केले.


खेड येथील प्रभाकर वाघ यांचा काल ( २१) जिल्हा रुग्णालयात मृत्यू झाला. त्यांच्यासोबत त्यांचा १५ वर्षांचा मुलगा आणि आई होती. हा रुग्ण कोरोनाबाधित नव्हता. चाचणी निगेटिव्ह आली होती; मात्र कुटुंबीयांनी सांगितले की, त्यांच्यावर येथेच अंत्यसंस्कार करा. रात्रभर कोणीच नातेवाईक नसल्याने ते दोघे हतबल झाले. संकल्प युनिक फाउंडेशन रत्नागिरी यांना हे कळले. त्यांची हतबलता पाहून ते मदतीसाठी पुढे आले. फाउंडेशनचे रत्नागिरीचे अध्यक्ष दिलावर कोंडकरी यांनी ही बाब युवा अध्यक्ष राजू भाटलेकर यांना सांगितली. 

हेही वाचा- स्थानिक चिंतेत...पक्ष कायकर्त्यांत धाकधुक! -


राजू भाटलेकर यांना सोबत घेऊन सर्व शासकीय सोपस्कर पूर्ण केले. त्यानंतर रत्नागिरी येथील पांढरा समुद्र स्मशानभूमीत दिलावर कोंडकरी, शकील गवाणकर, ईस्माइल नाकाडे, सयीद मुल्ला, युसूफ शिरगावकर यांनी मृतदेह आपल्या खांद्यावरून स्मशानभूमीत नेला. तेथे त्यांनी त्यांच्यावर अंत्यसंस्कार केले. या मुस्लिम बांधवांनी या ठिकाणी केलेले कार्य प्रेरणादायी आहे. या वेळी राजू भाटलेकर व उमेश कुलकर्णी यांनी मोलाचे सहकार्य केले.

हेही वाचा- मूर्तीकारांच्या चिंता संपता संपेनात! आता `हे` आव्हान -

संस्था तीन वर्षे जिल्ह्यात कार्यरत
 संकल्प युनिक फाउंडेशन रत्नागिरी ही संस्था गेली तीन वर्षे जिल्ह्यात सामाजिक कार्य करीत आहे. जाती-धर्म बाजूला ठेवून केवळ माणुसकी जपण्यासाठी या एनजीओचे शिलेदार अहोरात्र गोरगरिबांसाठी विनामूल्य झटत आहेत. जिल्हा शासकीय रुग्णालयातील गोरगरिबांना मदत करण्यापासून ते निधन झालेल्यांचे वेळ पडल्यास दहन, दफन करण्यापर्यंतची व्यवस्था ते करतात.

संपादन - अर्चना बनगे

loading image
go to top