प्रेरणादायी! ग्रामस्थांची आपुलकी, प्रेमामुळे संकटातही नाते आणखी घट्ट 

coronavirus impact subject sirial sindhudurg district
coronavirus impact subject sirial sindhudurg district

वैभववाडी (सिंधुदुर्ग) - कोरोनामुळे कुंभवडे येथे मुंबईकर चाकरमानी आणि ग्रामस्थ यांचे नाते आणखी घट्‌ट झाले आहे. ग्रामस्थांकडून मिळालेली आपुलकी आणि प्रेमामुळे क्‍वारंटाईन कक्षातील व्यक्ती भारावुन गेल्या आहेत. या कक्षातील तरूणांनी संपूर्ण शाळा आणि परिसराची स्वच्छता करून एक चांगला संदेश सर्वासाठी दिला आहे. 

कोरोनाचे संकट मोठे आहे. अनेकांच्या नोकऱ्या गेल्या आहेत. हजारो चाकरमानी आपआपल्या गावाकडे धावताना दिसत आहेत. सर्वत्र काळोख दिसत असला तरी कोरोनामुळे त्रस्त झालेल्यांना मदतीचे हात चहुबाजुनी पुढे येत आहे. समाजातील अनेक घटक कोरोनावर मात करण्यासाठी पुढे येत आहे. वैभववाडी तालुक्‍यातील कुंभवडे मुंबई आणि ग्रामीण ग्रामस्थ मंडळाने देखील आपल्या गावात आलेल्या चाकरमान्यांसाठी मदतीचा हात दिला आहे.

मुंबईत कोरोनाचा संसर्ग वाढल्यामुळे इतर गावांप्रमाणे कुंभवडे गावात सुध्दा मोठ्या प्रमाणात चाकरमानी आले. त्यांना केंद्रशाळा कुंभवडे येथे संस्थात्मक विलगीकरण करण्यात आले. या विलगीकरण कक्षात सध्या 25 हुन अधिक व्यक्ती आहेत. याशिवाय स्वतंत्र घरातुन 125 हुन अधिक चाकरमान्यांना गृह विलगीकरण करण्यात आले आहे. संस्थात्मक विलगीकरण कक्षातील व्यक्तींकरीता चहा,नाष्टा आणि भोजनाकरीता लागणारे सर्व साहीत्य मंडळांच्या माध्यमातुन ग्रामस्थांनी उचलण्याचा निर्णय घेतला.

या सकारात्मक निर्णयाचा परिणाम खुप चांगला झाला. गावातुन अनेक हात मदतीकरीता सरसावले. आपलेपणाने ग्रामस्थ विलगीकरण कक्षातील व्यक्तींसाठी सोयी सुविधा उपलब्ध करून देत असल्यामुळे गावात चाकरमानी आणि स्थानिक ग्रामस्थ असा भेदभाव नाहीसा झाला. कोरोनाच्या अनुषंगाने सोशल डिस्टीन्सींग,सॅनिटायझरचा वापर,याबाबतीत मात्र कुणीही तडजोड करीत नाही. परंतु कक्षातील कुणाची गैरसोय होणार नाही याची दक्षता सुध्दा गावनियत्रंण समितीच्या माध्यमातुन घेतली जात आहे. 

विलगीकरण कक्षात सध्या अनेक गावातील अनेक तरूण आहेत. त्यातील बहुतांशी हे माजी विद्यार्थी आहेत. या तरूणांनी शाळा इमारत, शाळा इमारतीचा परिसर स्वच्छ केला आहे. सलग दोन तीन दिवस स्वच्छतेचे काम हे तरूण करीत होते. त्यामुळे शाळेला एक वेगळी झळाळी मिळाली आहे. 
विलगीकरण कक्षातील व्यक्तींना अधिकाधिक सेवा मिळावी यासाठी सरपंच वैशाली सावंत, उपसरपंच संजय आमकर, माजी सभापती रमेश तावडे, नंदु शिंदे, दादा चाळके, ग्रामसेवक गजानन कोलते, अवधुत तळेकर, प्रमोद सांवत, बापु चव्हाण, शिक्षक परशुराम आमकार, वासुदेव चव्हाण, चंद्रकांत तावडे, अभिजीत पालांडे, मयुरी चव्हाण, लक्ष्मी केळकर यांच्यासह अधिक गावातील मंडळी प्रामाणिकपणे काम करीत आहेत. विलगीकरण कक्षातील व्यक्तींच्या आरोग्याची तपासणी करण्याचे काम आरोग्य कर्मचारी, आशा स्वयंसेविका अतिशय चोखपणे पार पाडत आहेत. 

वारकरी वारसा 
कुंभवडे गावाला वारकरी साप्रंदायाचा मोठा वारसा आहे.या गावातील मंदीरात दरवर्षी अखंड हरिनाम सप्ताह होतो.किर्तन,प्रवचनाने अखंड गाव न्हावुन जाते.आध्यात्मीक वारसा असलेल्या या गावात अतिशय चांगले वातावरण आहे.त्यामुळेच अतिशय मनापासुन गावातील सर्व लोक विलगीकरण कक्षातील लोकांना सेवा पुरवित आहेत. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com