भूखे मर रहे है, साहब हमें घर जाने दो!

coronavirus impact workers sindhudurg district
coronavirus impact workers sindhudurg district

कणकवली (सिंधुदुर्ग) - ""हमको पैसा नही दिया है, हम भुखे मर रहे है, हमको घर जाने दो साहब,'' अशी विनवणी करताना कंठ दाटून आल्याने कामगारांचे शब्द अडखळत होते. ही व्यथा येथे महामार्ग कामासाठी आलेल्या मजूरांनी आज प्रशासनाकडे मांडली. घरवापसीसाठी त्यांनी आपला बाडबिस्तारा गुंडाळून बसस्थानक गाठले खरे; पण कामाचे पूर्ण पैसे न मिळाल्याने व नियोजित काम अजून शिल्लक असल्याने त्यांचा व पोटठेकेदाराचा बसस्थानकातच वाद झाला. अखेर तहसीलसदार आर. जे. पवार आणि पोलिस निरीक्षक शिवाजी कोळी यांनी मध्यस्थी करत मजुरांची समजूत काढून त्यांना तुर्तास महिनाभर थांबण्यास सांगितले. 

कोरोनाच्या पार्श्‍वभूमीवर संपूर्ण देशातील लॉकडाउननंतर गरीब कामगार मजुर आपले घर गाठण्यासाठी प्रयत्नशील आहेत. जिल्ह्यातून अनेक परप्रांतीय मजूर रेल्वेतून आपल्या राज्यात परतले आहेत. सध्या महामार्गाचे काम सुरू आहे. यासाठी शेकडो परप्रांतातील मजूर जिल्ह्यात आहेत. आज ओरोसवरून श्रमिक रेल्वे निघणार आहे. या पार्श्‍वभूमीवर एका कंपनीच्या कामावर पोट ठेकेदारामार्फत काम करणाऱ्या सुमारे 200 कामगारांना कणकवली एसटी बस आगारातून सिंधुदुर्ग रोड रेल्वेस्थानकापर्यंत घेवून जाण्याची प्रक्रीया सुरू होती. यावेळी महसूलची यंत्रणा तेथे होती.

याचवेळी चौपदरीकरण कामाच्या संबंधित वरीष्ठ अधिकाऱ्यांनी या कामगारांना थांबण्याचे आवाहन केले. यावरून ते व मजूर यांच्यात वाद सुरू झाले. काही मजुरांना एसटी बसमधून त्यांनी खाली उतरवले होते. याचे कारण म्हणजे मुख्य कंपनीच्या पोट ठेकेदाराने पुलाचे बांधकाम हाती घेतले आहे; मात्र संबंधित ठेकेदाराने त्या कामगारांना गेले काही दिवस पगार दिला नव्हता. लॉकडाउनच्या कालावधीत पोटभर अन्न दिले नाही. हे वास्तव अधिकाऱ्यांच्यासमोर उघडे पडले. 

तहसीलदारांकडून दखल 
अखेर तहसीलदार पवार यांनी हस्तक्षेप करून तत्काळ जेवणाची व्यवस्था करण्याची ताकीद कंपनीच्या अधिकाऱ्यांना दिली. ठेकेदाराऐवजी थेट कामगारांना मजुरी द्या, असे बजावले. त्यानंतर अर्धवट स्थितीतील पुलाचे काम पूर्ण करून मग निघून जा. यासाठी 15 जूनला पर्यायी व्यवस्था केली जाईल, असे आश्‍वासन दिले. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com