esakal | कोरोना रॅपिड सेंटरबाबत सिंधुदुर्गात महत्त्वाचा निर्णय
sakal

बोलून बातमी शोधा

coronavirus rapid center design konkan sindhudurg

खारेपाटण चेकपोस्ट येथील सिंधुदुर्ग जिल्हा तपासणी नाक्‍यालाही भेट देऊन येथील महसूल पथक, आरोग्य पथक व पोलिस यंत्रणेची त्यांनी पाहणी केली.

कोरोना रॅपिड सेंटरबाबत सिंधुदुर्गात महत्त्वाचा निर्णय

sakal_logo
By
अनिकेत जामसंडेकर

खारेपाटण (सिंधुदुर्ग) - सिंधुदुर्ग जिल्ह्याचे प्रवेशद्वार असलेल्या खारेपाटण येथे 1 ऑगस्टपासून कोरोना रॅपिड टेस्ट सेंटर सुरू होणार आहे. याबाबतची माहिती जिल्हा शल्य चिकित्सक डॉ..धनंजय चाकूरकर यांनी आज येथे दिली. 

श्री.चाकुरकर यांनी आज येथील प्राथमिक आरोग्य केंद्राला भेट दिली. यावेळी ते पत्रकारांशी बोलत होते. त्यांच्यासोबत जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.. महेश खलीपे, खारेपाटण सरपंच रमाकांत राऊत, अतिरिक्त जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. नलावडे, अतिरिक्त जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. विजय नांदरेकर, खारेपाटण प्रा.आ.केंद्राच्या वैद्यकीय अधिकारी डॉ. प्रिया वडाम, सहायक वैद्यकीय अधिकारी डॉ. पूजा ताडे आदी उपस्थित होते. 

खारेपाटण येथे होत असलेल्या कोरोना रॅपिड टेस्ट केंद्राची पाहणी जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. चाकुरकर यांनी केली. त्यानंतर खारेपाटण सरपंच तथा ग्रामसनियंत्रण समितीचे अध्यक्ष रमाकांत राऊत यांच्याशी त्यांनी चाकरमान्यांच्या नियोजनाबाबत चर्चा केली. तसेच प्राथमिक आरोग्य केंद्राच्या अधिकारी डॉ.प्रिया वडाम आणि येथील कर्मचारी वर्गाला कोरोना-19 च्या पार्श्‍वभूमीवर योग्य सूचना दिल्या. तसेच खारेपाटण चेकपोस्ट येथील सिंधुदुर्ग जिल्हा तपासणी नाक्‍यालाही भेट देऊन येथील महसूल पथक, आरोग्य पथक व पोलिस यंत्रणेची त्यांनी पाहणी केली. 

डॉ. वडाम नोडल अधिकारी 
खारेपाटण येथील कोरोना रॅपिड टेस्ट सेंटर हे खारेपाटण प्राथमिक आरोग्य केंद्र येथे होणार आहे. येथील आरोग्य केंद्राच्या वैद्यकीय अधिकारी डॉ. प्रिया वडाम यांची नोडल ऑफिसर म्हणून नेमणूक करण्यात आली आहे. तसेच येथील एकूण 5 आरोग्य कर्मचारी वर्गाला याचे विशेष प्रशिक्षण देखील देण्यात आले आहे. 

संपादन - राहुल पाटील

loading image
go to top