रत्नागिरी: मोकाट गुरांच्या संगोपनासाठी पालिका बांधणार 'गोशाळा'

निमेश नायर; जिल्हाधिकाऱ्यांना पालिकेच्या हद्दीत जागा मिळण्यासाठी प्रस्ताव
रत्नागिरी: मोकाट गुरांच्या संगोपनासाठी पालिका बांधणार 'गोशाळा'
sakal

रत्नागिरी : शहरातील मोकाट गुरांविरुद्ध कारवाई करणारी पालिका आता प्राणीमित्र आणि विश्व हिंदू परिषदेचे लक्ष्य ठरत आहे. कोंडवाड्यामध्ये पकडलेल्या गुरांचे योग्य संगोपण आणि देखभाल, संवर्धन पालिकेकडून होत नाही, अशा तक्रारी वाढल्यामुळे पालिकेने पकडण्यात येणाऱ्या मोकाट गुरांच्या संगोपनासाठी गोशाळा बांधण्याचा निर्णय घेतला आहे.

रत्नागिरी: मोकाट गुरांच्या संगोपनासाठी पालिका बांधणार 'गोशाळा'
वैद्यकीय महाविद्यालय मंजुरीतील त्रुटी दूर करणार; राऊतांची माहिती

त्यासाठी शहराजवळील शासकीय जागा मिळावी यासाठी जिल्हाधिकाऱ्यांना प्रस्ताव दिला आहे. विशेषकरून आरोग्य सभापती निमेश नायर हे त्यासाठी प्रयत्नशील आहे. नगराध्यक्ष बंड्या साळवी यांच्या मार्गदर्शनाखाली ही प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. शहरामध्ये मोठया प्रमाणात मोकाट गुरांचा उपद्रव सुरू आहे. शहरालगतच्या गावातून ही मोकाट गुरे शहरात येतात. त्यांना कचराकुंडी किंवा अन्य ठिकाणी खाद्य मिळत असल्याने त्यांचा ठिय्या शहरात वाढत चालला आहे.

पालिका दरवर्षी मोकाट गुरांना पकडण्यासाठी खासकी संस्थांची नियुक्ती करून काही लाखात पैसे खर्च करत आहे. एवढेच नाही तर पकडण्यात येणारी गुरे कोंडवाड्यात ठेवून त्यांच्या देखभाल दुरुस्तीची जबाबदारीदेखील पालिकेलाच घ्यावी लागत आहे. गेल्या काही दिवसांमध्ये पालिकेने शहरांमधील सुमारे ८१ मोकाट गुरे पकडून पालिकेच्या कोंडवाड्यात ठेवली आहेत. त्यापैकी ४२ गुरे विश्व हिंदू परिषदेला संगोपनासाठी देण्यात आले. त्यानंतर पकडलेली काही मोकाट गुरे पालिकेच्या कोंडवाड्यात आहेत. त्याबाबतही तक्रारी वाढत चालल्या आहेत.

पालिकेमार्फत शहरात मोकाट गुरे पकडून पालिकेच्या तात्पुरत्या स्वरूपाच्या कोंडवाड्यात ठेवली जातात. परंतु त्या कोंडवाड्यात ठेवण्यात आलेल्या गुरांची योग्य देखभाल, संगोपन आणि संवर्धन करता येत नाही. कोंडवाड्यात असलेल्या मोकाट गुरांबाबत विश्व हिंदू परिषद, प्राणीमित्र संघटना व इतर समाजिक संस्थेकडून मोकाट गुरांचे योग्य संगोपन केले जात नसल्याबाबत तक्रारी प्राप्त झाल्या आहेत. पालिकेच्या शहर विकास आराखड्यामध्ये कोंडवाड्यासाठी आरक्षित जागा उपलब्ध नाही.

पालिकेच्या कार्यक्षेत्रात कोंडवाडा बांधण्यात आलेला नाही तरी पालिकेच्या हद्दीमध्ये मोकाट गुरांसाठी गोशाळा बांधकाम करण्यासाठी हद्दीतील ग्रामपंचायत महसूल भागातील शासकीय जागा उपलब्ध करून मिळावी जेणेकरून शहरातील मोकाट गुरामुळे होणारे संभाव्य नुकसान व होणारे अपघात टाळणे शक्य होईल. नागरिकांच्या वारंवार होणाऱ्या तक्रारींचे निवारण करता येईल.

तरी शहरातील मोकाट गुरांचे योग्य प्रकारे देखभाल व संगोपन करण्यासाठी पालिकेच्या हद्दीलगत ग्रामपंचायत महसूल विभागातील शासकीय जागा उपलब्ध करून मिळावी, असे पत्र आरोग्य सभापती निमेश नायर यांनी जिल्हाधिकाऱ्यांना दिले आहे. त्याचा विचार झाल्यास गोशाळेत त्यांचे योग्य संगोपण होऊन भविष्यात मोकाट गुरांचा उपद्रव थांबेल.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com