विकासाच्या प्रकाशामुळे रमेश कदमांना पोटदुखी

विकासाच्या प्रकाशामुळे रमेश कदमांना पोटदुखी

चिपळूण - रमेश कदम संस्थापक अध्यक्ष असलेल्या चिपळूण तालुका कबड्डी असोसिएशनने राज्यस्तरीय कबड्डी स्पर्धेसाठी ३१ लाखांच्या खर्चाचे अंदाजपत्रक दिले आहे. हा निधी प्रत्यक्ष खर्च होणार आहे. शहरात विकासाचा प्रकाश पडत असल्यामुळे रमेश कदमांच्या पोटात दुखायला लागले आहे. जनतेची दिशाभूल करून नागरिकांना सत्ताधाऱ्यांच्या विरोधी भडकावत आहेत, असा पलटवार भाजपचे नगरसेवक आशिष खातू यांनी ‘सकाळ’शी बोलताना केला. 

ते म्हणाले, पालिकेने राज्यस्तरीय नगराध्यक्ष चषक कबड्डी स्पर्धेचे आयोजन केले आहे. चिपळूण तालुका कबड्डी असोसिएशनने ३१ लाख खर्चाचे अंदाजपत्रक तयार करून पालिकेकडे प्रस्ताव दिला आहे. हा निधी पालिका खर्च करणार नाही तर असोसिएशनच्या ताब्यात देणार आहे. रमेश कदमांनी स्पर्धा भरवली तो काळ वेगळा होता. तेव्हा मॅटवरील स्पर्धेची क्रेझ नव्हती. पालिकेचा अर्थसंकल्प ४० कोटींवरून १५० कोटींवर पोहचला आहे. चिपळूणची पालिका ४० वर्ष रमेश कदम यांच्या ताब्यात होती. ४० वर्षांत त्यांनी जनतेला आश्‍वासनापलीकडे काहीच दिले नाही. पालिकेत भाजपची सत्ता आल्यानंतर शहराच्या विकासाला गती मिळाली. ४० वर्षांत जी कामे झाली नाहीत, ती कामे दोन वर्षांत सुरू झाली. 

रमेश कदम कबड्डीतील जुने, जाणते कार्यकर्ते आहेत. त्यांनी क्रीडा क्षेत्रात राजकारण आणू नये. कबड्डी स्पर्धेचे नियोजन भव्यदिव्य आहे. नियोजनात सुधारणा असेल तर रमेश कदमांनी त्या सूचवाव्यात. आम्ही त्यांचे स्वागत करू. 
- विजय चितळे, 

स्वीकृत नगरसेवक, भाजप

‘ते’ कदमांच्या आरोपांकडे दुर्लक्ष करतील
शहरात विकासाचा प्रकाश पडत आहे. पाच वर्षांत महत्त्वाची सर्वच कामे मार्गी लागतील. त्यानंतर नागरिकांना आश्‍वासन देण्यासाठी रमेश कदमांकडे कोणतेच मुद्दे शिल्लक राहणार नाहीत. त्यामुळेच रमेश कदम जनतेची दिशाभूल करून नागरिकांना सत्ताधाऱ्यांच्या विरोधी भडकावत आहेत. मात्र, सुज्ञ नागरिक रमेश कदमांच्या आरोपांकडे दुर्लक्ष करतील, असा विश्‍वास खातू यांनी व्यक्त केला. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com