लोणेरे येथील परिषदेची सांगता

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 24 डिसेंबर 2016

लोणेरे - माणगाव तालुक्‍यातील लोणेरे येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर तंत्रशास्त्र विद्यापीठात ‘मटेरियल्स, मॅन्युफॅक्‍चरिंग ॲण्ड डिझाईन’ या विषयावरील पहिली आंतरराष्ट्रीय परिषद २० आणि २१ तारखेला झाली. त्यात देशभरातील प्राध्यापक, शास्त्रज्ञ, अभियांत्रिकी विद्यालयांचे प्राचार्य व विद्यार्थी सहभागी झाले होते. 

दोन दिवसांच्या या परिषदेच्या पहिल्या दिवशी पार पडलेल्या कार्यक्रमासाठी सिंगापूर येथील नॅशनल युनियव्हर्सिटीचे प्राध्यापक डॉ. रहेमान हे प्रमुख वक्ते होते. विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. विलास गायकर यांनी डॉ. रहेमान यांचा सत्कार केला. परिषदेच्या दुसऱ्या दिवशी आयआयटी (मुंबई) च्या यांत्रिक विभागाचे प्रमुख डॉ. सुहास जोशी आणि अमेरिकेहून आलेले प्रा. डॉ. सतीश बुकपट्टणम्‌ यांचे व्याख्यान झाले.

Web Title: The Council concluded