गोंधळात पालघर लोकसभेच्या पोटनिवडणुकीत मतमोजणी सुरू 

प्रमोद पाटील 
गुरुवार, 31 मे 2018

 पालघर : गेल्या काही दिवसांपासून वेगवेगळ्या माध्यमातून वादाच्या भोवरयात सापडलेल्या पालघर लोकसभेच्या पोटनिवडणुकीची मतमोजणी आज सकाळी ८ वाजता मतमोजणी सुरु होणार होती. मात्र प्रशासनाने उशिरा मतमोजणीला सुरुवात केली. मतमोजणीला सुरूवात करतांनाच मतमोजणीसाठी वृत्तवाहीनींच्या पत्रकारांन‍ा मज्जाव केल्यामुळे गोंधळ निर्माण झाला होता. विविध वृत्तवाहिन्यांचे आणि  प्रिंट मिडियाच्या प्रतिनिधी आणि पोलिस यांच्यात वाद झाला.

मतमोजणीचे दोन फेऱ्या झाल्या तरी पत्रकारांना माहिती दिली जात नसल्याने पत्रक‍रांमध्ये निवडणुक अधिकार्यांच्या गचाळ व्यवस्थेविरुद्ध संताप व्यक्त  केला. पहिल्या फेरीमध्ये राजेंद्र गावीत यांनी आघाडी घेतल्यामुळे भाजपच्या कार्यकर्त्यांमध्ये जल्लोष निर्माण केला . तिसऱ्या फेरीपर्यंत बहुजन विकास आघाडी दुसऱ्या क्रमांकावर तर शिवसेना तिसऱ्या क्रमांकावर होती. पहिल्या फेरीपासुन चैथ्या फेरीपर्यंत भाजपचे उमेदवार राजेंद्र गावीत यांनी अाघाडी कायम ठेवली तर दुसऱ्या क्रमांकावर असेलेल्या बहुजन विकास आघाडीला मागे टाकत शिवसेना दुसऱ्या क्रमांकावर आली. पाचव्या फेरीपर्यंत भाजपने उभा केलेला मतांचा डोंगर कायम राहिल्याने भाजप कार्यकर्त्यांमध्ये आनंदाचे वातावरण दिसुन येत होते.

Web Title: Counting of votes in palghar lok sabha by-election