"सर्वांच्या आशीर्वादाने माझा कोरोना अहवाल निगेटिव्ह" ; उदय सामंत

राजेश शेळके
Wednesday, 5 August 2020

माझा सहकारी कोरोना बाधित आला होता. त्यामुळे मी काही दिवस विलगीकरणात होतो.

रत्नागिरी : काही दिवसांपूर्वी माझ्या संपर्कात आलेला माझा सहकारी कोरोना बाधित आला होता. त्यामुळे मी काही दिवस विलगीकरणात होतो. काल माझी कोविड 19 ची टेस्ट झाली. आपल्या सर्वांच्या आशीर्वादाने कोविड टेस्ट निगेटिव्ह आली आहे. आपले आशीर्वाद हीच माझी खरी ताकद आहे, असे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत यांनी ट्विट केले आहे.

हेही वाचा - मुंबई गोवा महामार्गावरील नद्यांना पूर ; हा मार्ग बंद.... 

गेली काही दिवस उदय सामंत क्वारंटाईन झाल्यामुळे अनेक चर्चांना उधाण आले होते. सिंधुदुर्गचे आ. वैभव नाईक यांची कोरोना टेस्ट पॉझिटिव्ह आली होती. या दरम्यान सिंधुदुर्गचे पालकमंत्री आणि उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत हे अनेक बैठकीला उपस्थित होते.

सामंत हे नाईक यांच्या संपर्कात आल्याने स्वतःहून मुंबईत क्वारंटाईन झाले होते. यादरम्यान त्यांच्या दोन ऑनलाइन पत्रकार परिषद झाल्या होत्या. यामध्ये ते म्हणाले, की मी सहकारी वैभव नाईक याच्या संपर्कात आल्याने स्वतः क्वारंटाईनचा झालो आहे. मात्र आठ दिवसाचा क्वारंटाईन कालावधी होण्यापूर्वीच विरोधकांनी मला कोरोना झाल्याचे ढोल पिटले. मात्र जनतेच्या आशीर्वादाने माझी प्रकृती ठणठणीत आहे. 

हेही वाचा - त्या बेपत्ता कोरोना रुग्णाचा मृतदेह  मिशनच्याच वार्डात.... 

नुकताच त्यांचा 14 दिवसाचा क्वारंटाईन कालावधी संपला आहे. त्यानंतर त्यांची कोविड टेस्ट केली. आजच त्यांच्या कोविड चाचणीचा अहवाल निगेटिव्ह आला आहे. त्यामुळे सर्वांचा जीव भांड्यात पडला आहे. कोरोना बाधित सहकार्‍याच्या संपर्कात आलो असल्याने काही दिवस विलगीकरणात होतो असे  ट्विट त्यांनी केले आहे. मात्र काल माझी कोविड टेस्टचा अहवाल निगेटिव्ह आला आहे. आपले आशीर्वाद हीच माझी ताकद आहे, अशी भावना त्यांनी व्यक्त केली.

संपादन - स्नेहल कदम 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: covid 19 report negative of uday samant