esakal | रत्नागिरीचे कोव्हीड योद्धे डॉ. दिलीप मोरे यांचे निधन....
sakal

बोलून बातमी शोधा

covid warriors  Pediatrician Dr. Dilip More Death in ratnagiri

६५ व्या वर्षी त्यांनी आपली सेवा थांबवण्याचा  घेतला निर्णय ... 

रत्नागिरीचे कोव्हीड योद्धे डॉ. दिलीप मोरे यांचे निधन....

sakal_logo
By
राजेश शेळके

रत्नागिरी  :  प्रसिद्ध बालरोगतज्ज्ञ आणि ४२ चिमुकल्यांवर यशस्वी उपचार करून त्यांना कोरोनाच्या विळख्यातून सोडवणारे डॉ. दिलीप मोरे यांचे आज निधन झाले. गोरगरिबांचे डॉक्टर म्हणून त्यांची ओळख होती. ६५ व्या वर्षी त्यांनी आपली सेवा थांबवण्याचा निर्णय घेतला आणि त्याच दिवशी त्यांना कोरोनाने वेढले. त्यांच्यावर जिल्हा रुग्णालयात उपचार सुरू होते. या उपचारांना त्यांच्याकडून सकारात्मक प्रतिसाद देखील मिळत होता. मात्र आज सकाळी अल्पशा आजाराने त्यांचे निधन झाले. आयुष्यभर ज्याने रुग्णांची फक्त सेवा केली अशा डॉक्टरांच्या जाण्याने समाजात हळहळ व्यक्त होत आहे.

बालरोगतज्ज्ञ डॉ.दिलीप मोरे गरीबांचे डॉक्टर म्हणून परिचित होते.जिल्हा शासकीय रूग्णालयात त्यांनी बालरोगतज्ञ म्हणून अनेक वर्ष सेवा बजावली. सेवानिवृत्तीनंतरही ते जिल्हा रूग्णालयात सेवा बजावत होते.त्याचबरोबर रत्नागिरीतील एस.टी.स्टॅंड परिसरात ते दवाखाना चालवत होते.

हेही वाचा- Photo : रत्नागिरीतील मंडणगडची ही नदी पात्राबाहेर... -

कोरोनाची साथ पसरताच रत्नागिरीत लहान मुलांनाही कोरोनाची लागण होऊ लागली.जन्मलेल्या चार दिवसाच्या बाळालाही कोरोनाची लागण झाली होती.अशा बालकांवर त्यानी उपचार केले होते. डॉ.दिलीप मोरे जिल्हा रूग्णालयात सेवा बजावत होते. साठी पार केलेली असतानाही ते रूग्णालयात येत होते.  लहान मुलांना पहायला कुणी डॉक्टर नसला तर..? हा विचार करून ते सेवा बजावत होते.

हेही वाचा- ३६ तास वीज पुरवठा खंडित, ६० गावांत परिस्थिती बिकट, जाणून घ्या सविस्तर -

जिल्हा रूग्णालयात दाखल झालेल्या 42 बालकांना त्यांनी कोरोनामुक्त केले.ही सेवा बजावत असताना कोरोनाने त्यांना गाठले. गेले आठ दिवस त्यांच्यावर जिल्हा कोविड रूग्णालयात उपचार सुरू होते. त्यांची कोरोनाशी सुरू असलेली झुंज आज पहाटे अडीच वाजता संपली.

संपादन - अर्चना बनगे

loading image
go to top