पतसंस्थेचे कर्ज लाटणाऱ्या दोन महिला व सोनारावर गुन्हा

सुनील पाटकर
मंगळवार, 10 जुलै 2018

महाड : बनावट सोने खरे असल्याचे भासवून महाड येथील ज्ञानदिप पतसंस्थेकडून सुमारे साडेतीन लाख रुपयांचे कर्ज लाटणाऱ्या दोन महिलावर व पतसंस्थेच्या अधिकृत सोनारावर फसवणूकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

महाड येथील ज्ञानदिप पतसंस्थेमध्ये सोने तारण कर्ज घेण्याकरता महाड मधील सुवर्णा मपारा व नुतन मपारा या दोघींनी मागणी केली होती. त्यावेळी पतसंस्थेच्या अधिकृत सोनार राजन शेठ यांनी बनावट सोने खरे असल्याचे भासवून पतसंस्थेची फसवणूक केली व या बनावट सोन्यावर पतसंस्थेकडून 3 लाख 67 हजार रुपयांचे कर्ज या दोघींना मिळवून दिले.

हा प्रकार 28 ऑक्टोबर 2015 ते 21 डिसेंबर 2017 या कालावधीत घडला. ही बाब निदर्शनास येताच पतसंस्थेचे मधुकर यादव यांनी महाड शहर पोलिस ठाण्यात 8 जुलैला तक्रार दाखल केल्यानंतर या तिघांवर फसवणूकीचा गुन्हा दाखल झाला आहे.

Web Title: Crime against two women and gold loan lenders