कोकण : चिपळुणात चोरट्यांचा धुमाकुळ, एकाच रात्रीत १३ फ्लॅटसह दोन बंगले फोडले

crime case in chiplun theft in 12 flat by thief in one day
crime case in chiplun theft in 12 flat by thief in one day

चिपळूण (रत्नागिरी) : शहरात गुरुवारी शहरातील गजबजलेल्या रॉयलनगर परिसरात १३ फ्लॅट चोरट्यांनी फोडले, तसेच पाग उघडा मारुती परिसरातील दोन बंगलेदेखील फोडले. काही ठिकाणी रोख रक्कम, दागिने चोरट्यांनी लंपास केले तर काही ठिकाणी चोरट्यांच्या हाती काहीच लागले नाही. दोन दुचाकीही चोरट्यांनी पळवून नेल्या. पोलिस निरीक्षक देवेंद्र पोळ यांनी तातडीने धाव घेऊन घटनास्थळांची पाहणी केली. ठसेतज्ज्ञ, श्वान पथकाला पाचारण करण्यात आले आहे. चोरी करण्यासाठी फ्लॅट आणि बंगल्याच्या कड्या तोडताना चोरट्यांनी सर्वत्र एकच पद्धत वापरल्याचे दिसून आले.

गुरुवारी मध्यरात्रीनंतर रॉयल नगर परिसरातील त्रिमूर्ती अपार्टमेंटच्या सी विंग मधील संतोष मोहिते यांच्या बंद फ्लॅटच्या दरवाज्याची कडी गॅस कटरने तोडून चोरट्यानी बेडरूम मध्ये प्रवेश करत येथील कपाटातील समान इतरत्र फेकून दागिन्यांचे डबे उघडून त्यामधून सोन्याची अंगठी तसेच सोन्याचे रिंग आणि पाच हजार रुपयांची रोकड घेत पोबारा केला. संतोष मोहिते हे नगर परिषद कर्मचारी असून संध्याकाळीच ते आपल्या मोरवणे या गावी गेले होते. बाजूलाच असलेला सुनील जाधव यांचा फ्लॅट देखील अशाच पद्धतीने फोडला. येथे चोरट्यांहाती काहीच लागले नाही. त्रिमूर्ती अपार्टमेंटच्या समोरच त्रिमूर्ती अपार्टमेंट ए विंग आहे. या बिल्डिंगच्या पहिल्या मजल्यावरील जैनब्बी लियाकत नेवरेकर यांचा बंद फ्लॅट देखील चोरट्यानी फोडला. येथे देखील बेडरूम मधील कपाट उघडून नासधूस करण्यात आली. मात्र येथे देखील चोरट्यांना काहीच गवसले नाही.

नेवरेकर हे संगमेश्वर येथील कळंबस्ते येथे राहतात त्यामुळे त्यांचा येथील फ्लॅट नेहमी बंदच असतो. याच बिल्डिंगच्या दुसऱ्या मजल्यावर शैलेंद्र तांबे यांचा बंद फ्लॅट फोडून चोरट्यानी पाहणी केली. याच परिसरातील सदिच्छा अपार्टमेंट मधील अरविंद कदम यांच्या फ्लॅटच्या दरवाजाची कडी अलगद तोडून चोरट्याने बेडरूममध्ये शिरकाव केला. अरविंद कदम, अली खान यांचा बंद फ्लॅट फोडून चोरट्यानी पाहणी केली. मात्र येथे चोरट्यांच्या हाती काहीच लागले नाही. याच बिल्डिंगच्या पार्किंग मधील प्रवीण ठसाळे यांची दुचाकी घेऊन चोरटे पसार झाले.


पाग परिसरातही धुमाकूळ

पाग परिसरात चोरट्यानी चिपळूण पंचायत समितीचे माजी सभापती सुभाष जाधव यांच्या बंगल्याचा दरवाजा फोडून आत प्रवेश केला. तेथे अंथरूण व काही कपडे घेऊन ते पसार झाले. सुभाष जाधव व त्यांचे कुटुंब वरच्या मजल्यावर होते. त्यांना याचा जराही थांगपत्ता लागला नाही. उदय चितळे यांच्या बंगल्याच्या पार्किंग मधील दुचाकी घेऊन चोरटे पसार झाले. तेथून चारचाकीही पळवण्याचा चोरट्यांचा प्रयत्न असफल ठरला.

संपादन - स्नेहल कदम 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com