घरचाच निघाला भेदी ; ग्रामस्थांच्या हुशारीमुळे चोरीचा प्रयत्न फसला

crime cases in ratnagiri chiplun thief arrested by village people
crime cases in ratnagiri chiplun thief arrested by village people

चिपळूण (रत्नागिरी) : मंदिरातील दानपेटी फोडण्याचे प्रकार वाढत असताना दानपेटी फोडणारा गावातीलच संशयित आढळून आल्याची घटना मूर्तवडे या ठिकाणी घडली. मूर्तवडे वाघजाई मंदिरात चोरीचा प्रयत्न केला जात असताना त्याला रंगेहाथ पकडण्यात आले आहे. सोमा गुणा कारकर (वय ६०) असे संशयिताचे नाव आहे. मार्गताम्हाणे आणि त्यानंतर तुरंबव येथील मंदिरातील दानपेटी अज्ञात चोरट्यांनी फोडल्याची घटना ताजी आहे. या ठिकाणी सीसीटीव्ही फुटेजही पोलिसांनी मिळवले आहेत; मात्र चोरटे पोलिसांना अद्यापही मिळून आलेले नाहीत. या दोन घटना घडल्या असताना मूर्तवडे या ठिकाणी अशीच घटना घडली; मात्र जागरूक ग्रामस्थांमुळे चोरटा ग्रामस्थांना दिसून आला आहे. संशयित सोमा कारकर याच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. कारकर याने आणखी काही ठिकाणी चोऱ्या केल्या आहेत का, याची तपासणी पोलिसांकडून केली जात आहे.

गुरव यांना उठवून आणले

सुनील विठ्ठल गुरव (वय ४५, रा. मूर्तवडे) याचे घर वाघजाई मंदिराजवळ आहे. सोमवारी (१) रात्री साडेदहाच्या सुमारास ते जेवून अंगणात बसले होते. या वेळी त्यांना मंदिरातून कोणीतरी ठोकत असल्याचा आवाज आला. त्यामुळे त्यांनी गावचे पुजारी योगेश धोंडू गुरव यांना उठवून आणले आणि दोघेही मंदिराकडे निघाले. बाहेर काळोखात उभे राहून आवाजाच्या दिशेने पाहत उभे होते. त्याचवेळी गावातील संशयित सोमा कारकर हा मंदिरातील दानपेटीचे कुलूप कोयतीने फोडताना ग्रामस्थांना दिसून आला. या प्रकरणी सावर्डे पोलिसांना माहिती देण्यात आली. पोलिस निरीक्षक भरत धुमाळ हे घटनास्थळी आले.

संपादन - स्नेहल कदम 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com