मांगरात ठेवलेले भात काळसेत अज्ञाताने पेटविले

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 24 नोव्हेंबर 2016

मालवण- काळसे धामापूर येथील रामदास जुवेकर या शेतकऱ्याने कापणी व झोडपणी करून शेतात ठेवलेल्या सात गोणी भाताला काल रात्री अज्ञाताने आग लावल्याची घटना घडली. या आगीत संपूर्ण भात जळून खाक झाल्याने हजारो रुपयांचे नुकसान झाले. शेती व्यवसायावरच कुटुंबाचा उदरनिर्वाह असणाऱ्या जुवेकर कुटुंबीयांनी भात कापणीनंतर शेत मांगरानजीक गोणीत भरून भात ठेवले होते. आज सकाळी उत्तम परब यांना गोणी ठेवलेल्या ठिकाणी आग लागल्याचे दिसून आले. शेत मांगरानजीक धुराचे लोट दिसून आले. त्यांनी तत्काळ याची माहिती जुवेकर कुटुंबीयांना देत आग विझविली. शेतीसह मोलमजुरी करणाऱ्या जुवेकर कुटुंबीयांवर या आगीमुळे मोठे संकट कोसळले आहे. ही आग नेमकी कोणत्या कारणामुळे लागली, याचा उलगडा झाला नाही.

Web Title: crime in malvan