गुन्ह्यांमध्ये वाढ; शिक्षेचे प्रमाणही वाढले

गुन्ह्यांमध्ये वाढ; शिक्षेचे प्रमाणही वाढले

जिल्ह्यातील स्थिती - ५० टक्‍क्‍यांवर नेण्याचा प्रयत्न; ९८१ पैकी ६३० उघड
रत्नागिरी - जिल्हा पोलिस दलाने २०१६ मध्ये दाखल झालेल्या गुन्ह्यांची चांगली उकल केली आहे. खून, खुनाचा प्रयत्न, बलात्कार, दरोडा, घरफोडी, चोरी आदी ९८१ गुन्ह्यांपैकी ६३० गुन्हे उघड केले आहेत. गेल्या वर्षीच्या तुुलनेत गुन्हे वाढले असले, तरी उघड होण्याचे प्रमाणही वाढले आहे.

गुन्ह्यातील शिक्षांचे प्रमाण २७ टक्के आहे. येत्या काही दिवसांत ते ५० टक्‍क्‍यांवर नेण्याचा प्रयत्न आहे. त्याअनुषंगाने अभ्यास आणि अंमलबजावणी सुरू आहे, अशी माहिती जिल्हा पोलिस अधीक्षक प्रणय अशोक यांनी दिली.

येथील पोलिस अधीक्षक कार्यालयात पत्रकार परिषदेत त्यांनी ही माहिती दिली. ते म्हणाले की, जिल्ह्यामध्ये २०१६ मध्ये १४ खून झाले. त्यापैकी १३ गुन्हे उघड झाले. खुनाच्या प्रयत्नाचे १५ गुन्हे दाखल झाले आणि सर्व उघड झाले. सदोष मनुष्यवधाचे तीनही गुन्हे, गर्दी मारामारी ९८, दुखापतीचे १६६, बलात्काराचे ४५ (त्यापैकी ४४ उघड), विनयभंगाचे ८६ (त्यापैकी ८५ उघड), दरोड्याचे ५ घडले. त्यामध्ये ८३ लाख ३९ हजार ६० एवढा माल लुटण्यात आला. त्यापैकी ७४ लाख ९९ हजार ८१० रुपयांचा ऐवज जप्त करण्यात आला. जबरी चोरीच्या ३१ गुन्ह्यांपैकी २२ उघड झाले. चोरीला गेलेल्या १६ लख ५२ हजार ८०० रुपयांपैकी ४ लाख ९० हजार रुपयांचा ऐवज जप्त केला. ११५ घरफोडींपैकी ४९ ची उकल झाली. यामध्ये ७६ लाख ६४ हजारांचा ऐवज लंपास झाला, त्यापैकी २४ लाख ७१ हजार १३० रुपयांचा ऐवज जप्त केला. चोरीच्या ४०३ प्रकरणांपैकी १३० उघड झाली. यामध्ये ३ कोटी १२ लाख ९४ हजार ७८९ एवढा माल लुटण्यात आला. त्यापैकी १ कोटी १४ लाख ९४ हजार ८६१ एवढा ऐवज जप्त करण्यात पोलिसांना यश आले.

दारूबंदीच्या २४६ केसेस झाल्या. त्यामध्ये २४९ आरोपींवर कारवाई झाली. त्यामध्ये ४० लाख ५१ हजार १६२ रुपये किमतीचा माल जप्त करण्यात आला. वर्षभरात जुगाराच्या फक्त ४५ केसेस उघड झाल्या. त्यामध्ये ९१ आरोपींवर कारवाई करून १ लाख ७६ हजार ९३६ रुपयाचा माल जप्त केला. अंमली पदार्थविरोधी ४ केसेस करून ४ आरोपींवर कारवाई झाली. यामध्ये २६ हजार ७४० रुपयाचा माल जप्त करण्यात आला. वन्यजीव अधिनियमाअंतर्गत २ कारवाया करून ३ आरोपी पकडले. त्यामध्ये ११ लाख ६३ हजार १०० माल जप्त केला. अवैध हत्यारे बाळगल्याप्रकरणी ११ कारवाया करून त्यामध्ये १३ आरोपींना पकडले. त्यामध्ये १९ हत्यारांसह ५ लाख ९० हजार ५२५ रुपयाचा माल जप्त केला, अशी माहिती प्रणय अशोक यांनी दिली. 

तरुणांत जागृतीचा प्रयत्न
इसिस या दहशतवादी संघटनेच्या संपर्कात तरुण असल्याचे उघड झाले. त्याचा थेट संबंध जिल्ह्याशी होता; परंतु एटीएसने केलेल्या कारवाईमध्ये इसिसच्या संपर्कात असलेले तरुण मुंब्रामध्ये (मुंबई) होते. तरीही संबंध नाही म्हणून जिल्हा पोलिस गप्प बसलेले नाहीत. अशा तरुणांमध्ये जागृती करण्याचा आमचा प्रयत्न सुरू आहे, अशी माहिती जिल्हा पोलिस अधीक्षक प्रणय अशोक यांनी दिली.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com