काजूवरही माकड संकट

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 4 मार्च 2017

सावंतवाडी - माकडतापाने डोकेदुखी वाढली असतानाच माकडांमुळे यंदा काजूच्या उत्पन्नालाही फटका बसत आहे. माकडे काजूवर डल्ला मारत असल्याने बागायतदार हैराण झाले आहेत. आरोस दांडेली परिसरामध्ये माकडांच्या उच्छादामुळे नवीन फलधारणा झालेली काजू बी ची नासधूस होत आहे. माकडांना हाकलण्यासाठी खास व्यक्ती तैनात करण्याची वेळ काजू बागायतदारांवर आली आहे.

आरोस-दांडेली परिसरात मोठ्या प्रमाणात माकडांचा वावर असतो. परिसरातील जंगलमय भागातून कळपा कळपाने एकाचवेळी हे दाखल होतात. घरावरून

तसेच एका फांदीवरून दुसऱ्या फांदीवर उड्या मारणे हे कायमचे दुखणे बनून बसले आहे. त्यामुळे या समस्येकडे मात्र नागरिक दुर्लक्ष करतात. आरोस, दांडेली, पाडलोस, न्हावेली रेवटेवाडी परिसरात मोठ्या प्रमाणात काजूच्या बागा आहेत. काही लोकांनी काजू फलधारणा होण्याआधी काजू बागायतीची चांगल्या प्रमाणात मशागत केली. काही जण 

आपल्या बागायती भाडेतत्त्वावर काजू बागायती करार तत्त्वावर देतात. काजू बागायतींना नुकतीच प्राथमिक स्वरूपाची फलधारणा होत आहे. काही ठिकाणी चांगल्या प्रकारे काजू लटकतही असल्याचे चित्र आहे. याच कालावधीत आता माकडांनी बराच हैदोस घातला आहे.

माकडतापाने परिचित असलेली माकडे आता काजू पिकाच्या समस्याचे कारण बनली आहेत. सध्या बाजारात सुरवातीच्या काळातच काजू बियांना चांगला बाजारभाव मिळत आहे; परंतु माकडांकडून होणाऱ्या नासधुशीमुळे बागायतदार हैराण झाले आहेत. यावर उपाय म्हणून माकडांना हाकलण्यासाठी खास एखाद्या व्यक्तीला पाळत ठेवण्याची वेळ येत आहे. गतवर्षीपेक्षा यंदाच्या वर्षी माकडांच्या काजू बागायतीत नासधूस करण्याच्या समस्येत प्रचंड वाढ झालेली अनेकांकडून सांगण्यात येत आहे. पूर्वी घराच्या छपरावर उड्या मारण्यासाठी येणाऱ्या माकडांच्या कळपात माकडांची कमी संख्या असायची. मात्र, आता यात वाढ दिसून येत असल्याचे चित्र आहे.

यंदा नुकसानीची तीव्रता वाढली
एरव्ही माकड काजू पिकाचे नुकसान करताना फारसे दिसत नाही. यंदा मात्र काजू पिकांवर माकडांचा उपद्रव जाणवू लागला आहे. या ठिकाणी कच्च्या स्वरूपातच राहिलेल्या काजूच्या फळधारणेवर संकट कोसळले आहे. सुरक्षा करण्यासारखा कोणत्याही स्वरूपाचा ठोस उपायच नाही. यामुळे माकडांच्या समस्या सोडविण्यासाठी कोणती उपाययोजना करावी, असा प्रश्‍न आहे.

Web Title: The crisis raises up nuts

टॅग्स