सावंतवाडी येथील मोती तलावात सापडले मगरीचे पिल्लू

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 11 जानेवारी 2019

सावंतवाडी - पालिकेच्यावतीने मोती तलावात मासे पकडण्याचे काम ठेकेदारामार्फत सुरू असताना आज चक्क दोन फुट मगरीचे पिल्लू जाळयात आढळून आले. ती मगर पालिकेने वनविभागाच्या ताब्यात दिली.

सावंतवाडी - पालिकेच्यावतीने मोती तलावात मासे पकडण्याचे काम ठेकेदारामार्फत सुरू असताना आज चक्क दोन फुट मगरीचे पिल्लू जाळयात आढळून आले. ती मगर पालिकेने वनविभागाच्या ताब्यात दिली.

गेले अनेक दिवस येथील मोती तलावात मगरी असल्याची चर्चा होती. दीड-दोन वर्षांपूर्वी अनेकांना दर्शन दिले होते. दीड वर्षापूर्वी एका महाकाय मगरीचा मोती तलावाच्या सांडव्यात मृतदेह आढळून आला होता. आज ठेकेदार यांच्यावतीने मासेमारी करण्यासाठी लावण्यात आलेल्या जाळ्यात तब्बल दोन फूट मगरीचे पिल्लू आढळून आले. ते मोठ्या शिताफीने पकडण्यात आले. याबाबतची माहिती नगराध्यक्ष बबन साळगावकर यांनी दिली.

नरेंद्र डोंगर परिसरातून येणाऱ्या नाल्यामधून हे मगरीचे पिल्लू तलावात आले असावे, असा संशय वन विभागाने व्यक्त केला आहे. पकडण्यात आलेले पिल्लू नैसर्गिक अधिवासात सोडण्यात येणार असल्याचे त्यांच्याकडून सांगण्यात आले. मगर पाहण्यासाठी येथील नागरिकांनी मोठी गर्दी केली होती.

Web Title: Crocodile found in Moti lake at Sawantwadi

टॅग्स