esakal | निसर्ग वादळाचा सुपारीला फटका; कोकणात 100 हेक्‍टवरील बागा जमीनदोस्त

बोलून बातमी शोधा

crop areca nut 100 hectares damaged nisarga cyclone in konkan mandangad

निसर्ग चक्रीवादळाचा दापोली, मंडणगड या दोन तालुक्‍यांना मोठा फटका बसला, नारळ, सुपारीच्या बागांचे मोठे नुकसान झाले.

निसर्ग वादळाचा सुपारीला फटका; कोकणात 100 हेक्‍टवरील बागा जमीनदोस्त

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

दाभोळ (रत्नागिरी) : धार्मिक कार्यात अनन्यसाधारण महत्त्व असलेल्या सुपारीचे गतवर्षी झालेल्या निसर्ग चक्रीवादळामुळे दापोली व मंडणगड तालुक्‍यातील १०० हेक्‍टर क्षेत्र मोठ्या प्रमाणात नष्ट झाल्याची माहिती दापोली तालुका सुपारी खरेदी-विक्री सहकारी संस्थेचे अध्यक्ष व कृषी बाजार समिती रत्नागिरीचे संचालक मधुकर दळवी यांनी दिली.

निसर्ग चक्रीवादळाचा दापोली, मंडणगड या दोन तालुक्‍यांना मोठा फटका बसला, नारळ, सुपारीच्या बागांचे मोठे नुकसान झाले. अनेक नारळ व सुपारीच्या बागा जमीनदोस्त झाल्या. दापोली व मंडणगड तालुक्‍यात सुपारीचे १०० हेक्‍टर क्षेत्र असून, राजापूर, गुहागर, रत्नागिरी या तीन तालुक्‍यांत सुमारे ५०० हेक्‍टरवर सुपारीचे क्षेत्र आहे. 

हेही वाचा - चिंताजनक! राजापुरात 21 शाळा व्हेंटिलेटरवरच

चक्रीवादळामुळे दापोली व मंडणगड तालुक्‍यातील सुपारी बागायतदारांचे मोठे नुकसान झाले आहे. सध्या राजापूर, गुहागर व रत्नागिरी या तीन तालुक्‍यांमधूनच १०० ते २०० हेक्‍टरवरील सुपारीची विक्री गुजरात राज्यात केली जाते. निसर्ग चक्रीवादळाच्या फटक्‍यामुळे दापोली, मंडणगडमधील सुपारीची झाडे जमीनदोस्त झाली. यामुळे बागायतदारांचे लाखोंचे नुकसान झाले. दापोलीतील सुपारी ही गुजरात येथे जात होती.

परजिल्ह्यातून विविध तऱ्हेची प्रक्रिया केलेली सुपारी रत्नागिरी जिल्ह्यात येते. चक्रीवादळानंतर सुपारीची इतर तालुक्‍यांमध्येही घट झाली आहे. त्यामुळे २०० हेक्‍टरवरील मिळणारी सुपारी आता फक्त १०० हेक्‍टरवरचीच उपलब्ध होत आहे. ग्रामीण भागांमध्ये किरकोळ अशी १ ते २ रुपयांना १ सुपारी मिळत आहे. 

नवीन लागवडीपासून दहा वर्षांनंतर उत्पन्न

दापोली, मंडणगड तालुक्‍यातील सुपारी बागायतदारांना आता पुन्हा सुपारीची लागवड आपल्या बागांमध्ये करावी लागणार असून, त्यापासून उत्पन्न मिळण्यास किमान १० वर्षांचा कालावधी जाणार असल्याने आता या दोन तालुक्‍यांना इतर तालुक्‍यातून खाण्यासाठी सुपारी आणावी लागणार आहे.