पालीतील विठ्ठल मंदिरात भविकांची गर्दी

अमित गवळे
सोमवार, 23 जुलै 2018

पाली - येथील खडक आळीतील एकमेव विठ्ठल मंदिरात आषाढी एकादशी निमित्त सोमवारी (ता.23) सकाळ पासूनच भविकांनी गर्दी केली होती. तसेच काही शाळांच्या दिंडया देखील मंदिरात आल्या होत्या.

पाली - येथील खडक आळीतील एकमेव विठ्ठल मंदिरात आषाढी एकादशी निमित्त सोमवारी (ता.23) सकाळ पासूनच भविकांनी गर्दी केली होती. तसेच काही शाळांच्या दिंडया देखील मंदिरात आल्या होत्या.

विठ्ठल मंदिरास रोशणाई केली होती. मंदिर व विठ्ठल रखुमाई यांच्या मूर्ती फूल व हारांनी सजविण्यात आले होते. धुप व अगरबत्ती यांच्या सुवासाने मंदिरात सुगंध दरवळत होता. सर्व वातावरण भक्तिमय झाले होते. येथील जानकीबाई लिमये शाळा तसेच टॉपवर्थ इंग्लिश मीडियम स्कुल आणि तालुक्यातील प्राथमिक शाळांतील विद्यार्थी टाळ-मृदुंग आणि हरिनामाच्या गजरात दिंडीत सहभागी झाले होते. विठ्ठल मंदिर विश्वस्थांनी सुद्धा भविकांची योग्य सोय केली होती. येथे खडक आळी महिला मंडळाच्या वतीने रात्री भजनांचा कार्यक्रम आयोजित केला आहे.
 
Web Title: A crowd of devotees in Pithi Vitthal temple

टॅग्स