संकष्टीनिमित्त बल्लाळेश्वराच्या दर्शनासाठी पालीत भाविकांची गर्दी

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 24 मार्च 2019

पाली (रायगड) : संकष्टी चतुर्थी निमित्त येथील अष्टविनायकापैकी एक असलेल्या बल्लाळेश्वराच्या दर्शनासाठी रविवारी (ता.24) पालीत भाविकांनी गर्दी केली होती. सकाळपासूनच पालीत मोठ्या प्रमाणात दर्शनासाठी भाविक आले होते. येथील दुकानदार व हाॅटेल व्यवसायिकांचा धंदा चांगला झाला.

पाली (रायगड) : संकष्टी चतुर्थी निमित्त येथील अष्टविनायकापैकी एक असलेल्या बल्लाळेश्वराच्या दर्शनासाठी रविवारी (ता.24) पालीत भाविकांनी गर्दी केली होती. सकाळपासूनच पालीत मोठ्या प्रमाणात दर्शनासाठी भाविक आले होते. येथील दुकानदार व हाॅटेल व्यवसायिकांचा धंदा चांगला झाला.

रविवारी सुट्टी असल्याने तसेच दहावी व बारावीच्या परीक्षा नुकत्याच संपल्याने मोठ्या प्रमाणात दर्शनासाठी भाविक पालीत आले होते. भाविकांच्या गाड्यांमूळे पालीत वाहतुक कोंडी झाली होती. परंतू पाली पोलीस व बल्लाळेश्वर देवस्थानचे सुरक्षा रक्षक वाहतूक कोंडी सोडविण्यासाठी प्रयत्न करत होते. संकष्टीनिमित्त मंदिर परिसरातील दुकाने व हाॅटेल ग्राहकांनी गजबजले होते. मंदिर परिसरात मोठी वर्दळ पहायला मिळत होती. भाविकांच्या सोईसाठी बल्लाळेश्वर देवस्थान ट्रस्टच्यावतीने चोख व्यवस्था करण्यात आली होती. परिसरातील हॅाटेल, खेळण्याची व शोभिवंत वस्तुंची दुकाने, नारळ, हार, फुल व पापड मिरगुंड, कडधान्य विक्रेते, प्रसाद व पेढेवाले अादिंचा धंदा तेजित होता. 

''बल्लाळेश्वर देवस्थान ट्रस्टच्यावतीने भाविकांच्या सोयीसाठी शुद्ध थंड पाण्याची व्यवस्था करण्यात आली आहे. नाममात्र दरात प्रसादालयामध्ये प्रसाद उपलब्ध आहे. भाविकांना राहण्यासाठी दोन सुसज्ज भक्त निवास आहेत. रांगेत उभे राहण्यासाठी रेलींग व शेड उभारण्यात आली आहे. वाहने पार्क करण्यासाठी देवस्थानची दोन भव्य पार्किंग देखील आहे. तेथे मोफत पार्किंगची व्यवस्था आहे. तसेच सुसज्ज स्वच्छता गृह देखिल उभारण्यात आले आहेत. त्यामुळे दर्शनासाठी येणार्या भाविकांची कुठल्याही प्रकारची गैरसोय होत नाही.''
- अॅड. धनंजय धारप, अध्यक्ष, बल्लाळेश्वर देवस्थान ट्रस्ट, पाली 

 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: A crowd of pilgrims in pali for Ballaleshwar