traffic
traffic

मुंबई गोवा महामार्गावर वाहनांची गर्दी

पाली - सध्या उन्हाळ्याच्या सुट्ट्या लागल्या आहेत. त्यामुळे चाकरमानी कोकणात आपल्या गावाककडे जाण्यासाठी निघाले आहेत. त्याचबरोबर पर्यटक देखिल जिल्ह्यातील तसेच तळ कोकणातील पर्यटनस्थळे पाहण्यासाठी कोकणाकडे मोठ्या प्रमाणात निघाले आहेत. परिणामी दोन्हीकडे जाणाऱ्या एसटी बसेस फुल झाल्या आहेत. त्यामुळे प्रवास्यांची मोठी गैरसोय होत आहे. खाजगी वाहतुकदारांची यामुळे चंगळ होत आहे.

मुंबई-गोवा महामार्गावर वाहनांची गर्दी वाढली आहे. माणगाव, कोलाड आदी ठिकाणी वाहतूक धिम्या गतीने सुरु असते. तरवडखळ, वाकण, कोलाड,   इंदापुर, माणगाव आदी ठिकाणी वाहनांची गर्दी असते.

अनेकांनी एसटी बसेसच्या बहुतांश जागांचे आधीच आरक्षण केलेले असते. त्यामुळे  या बसेस खचाखच भरुन जात आहेत. महामंडळाने कोकणाकडे जाणाऱ्या जादा गाड्या देखिल सुरु केल्या आहेत. मात्र त्या देखिल फुल भरुन जात आहेत. बऱ्याच वेळा चालकाच्या केबिनमध्ये देखिल मोठ्या प्रमाणात प्रवाशांनी गर्दी केलेली दिसते.

वेळेत आणि आरामदायी प्रवास करण्यासाठी अनेक जण खाजगी प्रवासी वाहनांना पसंती देवून अधिकची रक्कम खर्च करुन गावाकडे जात आहेत. याचा फायदा खाजगी प्रवासी वाहतुकदारांना होत आहे. ज्या लोकांना खाजगी वाहतुक परवडण्याजोगी नाही व ज्यांना जवळपासच्या ठिकाणी जायचे आहे, त्या लोकांना मात्र एस.टी.ची वाट पहावी लागते. कारण लांब पल्याच्या गाड्या त्यांना घेत नाहित व मधल्या थांब्यावर देखील थांबत नाही. 

तसेच बसेस गच्च भरुन गेल्याने अनेकांना उभे राहुनच प्रवास करावा लागतो. बहुतांश प्रवाश्यांना मिळेल त्या वाहनाने प्रवास करावा लागतो. परिणामी वृद्ध, महिला आणि लहाग्यांचे मोठे हाल होत आहेत. तसेच यानिमित्त निघालेले नोकरदार व महाविदयालयीन विदयार्थ्यांचे मात्र हाल होत आहेत. गाडीची वाट पाहत त्यांना खुप वेळ खोळंबावे लागले.

नियमांचे उल्लंघन
बेशिस्त वाहनचालक, अवजड वाहने, लेन सोडून पुढे जाणारी वाहने तसेच महामार्गाचे सुरु असलेले काम यामुळे मुंबई गोवा महामार्गावर वाहहतुक कोंडी होत आहे. वाहतुक कोंडीवर नियंत्रण मिळविण्यासाठी वाहतूक पोलिस महामार्गावर ठिकठिकाणी तैनात आहेत. तसेच नाक्यांवर पोलिस चौक्या उभारल्या आहेत. परंतु, महामार्गवारील वाहतुकीचा भार बघता पोलिसांवर वाहतुक कोंडी सोडवितांना ताण येत आहे.

वाकण नाक्यावर वाहतुक कोंडीचा अधिक भार 
मुंबई गोवा महामार्गावर वाकण नाक्याजवळ अधिक वाहतुक कोंडी होते. कारण पाली खोपोली मार्गावरुन येणारी वाहने आणि मुंबई गोवा महामार्गावरुन येणारी वाहने येथे एकत्र येतात. त्यामूळे वाहनांची गर्दी वाढते. तसेच वाकण नाक्यावर रस्त्याच्या कडेला अनेक वाहने उभी केलेली असतात. त्यामुळे येथून जाणाऱ्या येणाऱ्या वाहनांना मार्ग काढता येत नाही. वाकण नाक्यावर आंबा नदीवर असलेला अरुंद पुल यामुळे वाहनांना जाण्यास अडथळा येतो. या पुलावरुन अवजड तसेच मोठी वाहने जातांना दुसरी वाहने एका बाजुने येवू शकत नाहीत. त्यामुळे वाहनांची एक रांग जाईपर्यंत इतर वाहनांना थांबावे लागते. या सर्व कारणांमुळे वाकण नाक्याजवळ मुंबई गोवा महामार्गावर वाहतुक कोंडी अधिक प्रमाणात होते.

माणगावमध्ये सुद्धा वाहनांच्या रांगा
अरुंद रस्ता, रस्त्यावरील हातगाडी व फेरीवाले, दुतर्फा उभी केलेली वाहने आणि वाहनांची जास्त संख्या यामुळे मुंबई गोवा महामार्गावर माणगाव शहरात देखिल वाहतुक कोंडी होत आहे. वाहनांच्या लांब रांगा लागत आहेत. प्रवाश्यांना अनेक तास वाहतुक कोंडीमध्ये अडकुन बसावे लागत आहे. पादचार्यांचे सुद्धा हाल होतात. वाहतुक पोलिस वाहतुक सुरळीत करण्याचा प्रयत्न करतात परंतु वाहतुकीवर ताण आल्याने वाहतुक कोंडी सोडविणे जिकरीचे होऊन बसते.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com