नोटाबंदी विरोधात ६ ला आंदोलन

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 31 डिसेंबर 2016

कणकवली - नोटाबंदीमुळे देशात काहींचा बळी गेला आहे तर गेल्या ५० दिवसांत अनेक नियमही बदलले याचा कमी अधिक प्रमाणात ग्रामीण भागातही फटका बसला. या विरोधात काँग्रेसने देशभरात आंदोलन पुकारले. या पार्श्‍वभूमीवर ६ जानेवारीला सिंधुदुर्ग काँग्रेसतर्फेही छेडले जाणार आहे. काँग्रेस नेते नारायण राणे यांच्या उपस्थितीत हे आंदोलन जिल्ह्यात ठिकठिकाणी करण्याची तयारी सुरू झाली आहे. 

काँग्रेस नववर्षात नोटाबंदी आणि पंतप्रधानांवरील भ्रष्टाचाराच्या आरोपांप्रकरणी तीन टप्प्यांत देशव्यापी आंदोलन करणार आहे. पहिल्या टप्प्याची सुरवात ६ जानेवारीपासून होईल. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गुजरातच्या मुख्यमंत्रिपदी असताना काही उद्योग समूहांकडून तब्बल ६५ कोटी रुपयांची लाच घेतल्याचा आरोप काँग्रेस उपाध्यक्ष राहुल गांधी यांनी केला होता. या पार्श्‍वभूमीवर हे आंदोलन छेडले जाणार आहे. जिल्ह्यात कोठे हे आंदोलन छेडले जाईल, यांची माहिती अद्याप जाहीर झालेली नाही, मात्र श्री. राणे हे जिल्हा दौऱ्यावर आल्यानंतर या आंदोलनाची रूपरेषा ठरणार आहे. 

जिल्ह्यात अजून बॅंकांचे व्यवहार सुरळीत झाले नाहीत. सहकार क्षेत्रावर मोठी आर्थिक मंदी ओढवली आहे. रोजगार आणि मजूरदारांना आर्थिक संकटातून जावे लागत आहे. नोटाबंदी विरोधात काँग्रेसने सोशल मीडियावरून टीका सुरूच ठेवली आहे. आता थेट रस्त्यावरील आंदोलनात काँग्रेस उतरणार आहे.

Web Title: currency ban agitation oppose by congress