गांधी विचार रुजविण्यासाठी सायकल फेरी

गांधी विचार रुजविण्यासाठी सायकल फेरी

साडवली - साने गुरुजी प्रतिष्ठान मिरज, राष्ट्र सेवा दल जि. सांगली तर्फे १९ व्या राष्ट्रीय एकात्मता सायकल अभियानाला रविवारी (ता. ११ ) प्रारंभ झाला. मिरज ते मालवण, कुणकेश्वर परत मिरज असा ४६० कि. मी.अंतराचे हे अभियान सोमवारी संध्याकाळी फोंडा घाट उतरुन गावात मुक्कामाला पोचले.

सदाशिव मगदुम, दिनकर आदाटे, रमेश हेगाणे यांच्या मार्गदर्शनाखाली या सायकल अभियानात १० वर्षापासुन ८६ वर्ष पर्यंत सायकलस्वार सहभागी झाले आहेत. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील फोंडाघाट उतरल्यानंतर फोंडा गावात दिवंगत मधु दंडवते यांचे सहकारी बापु नेरूरकर यांनी या अभियानाचे स्वागत केले. यावेळी सरपंच संतोष आग्रे,सामाजिक कार्यकर्ते युयुत्सु आर्ते, आर आर कदम, प्रा.जगदिश राणे उपस्थित होते.

महात्मा गांधी यांच्या १५० व्या जयंती वर्षानिमित्त हे अभियान राबवले जाणार आहे. या सायकल फेरीत पाचवित शिकणारा सांगलीचा विराज पाटील तसेच ८६ वर्षीय डाॅ.रामचंद्र शांत तसेच पायाने अधु असलेले श्रीकांत पाटील सहभागी झाले आहेत.

गांधी विचार, राष्ट्र सेवा दलाचे कार्य, पर्यावरण, निसर्ग वाचवा असे उद्देश घेवून हि सायकल फेरी मिरजहून निघाली आहे. मंगळवारी मालवण, बुधवारी कुणकेश्वर, गुरुवारी वैभववाडी, शुक्रवारी गगनबावडा, शनिवारी परतीचा प्रवास असा मार्ग आहे. या आधी कोकण, कर्नाटक भागात हे अभियान राबवले गेले.जय संस्कार, जय ज्ञान, जय विज्ञान, जय जवान जय किसान हा यांचा नारा आहे. या सायकलस्वारांचे ठिकठिकाणी चांगले स्वागत होत आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com