एसआर किताबापासून आलेकर बंधू दोन पावले दूर

cycling club  victor vikrant aalekar amar aalekar birthday story chiplun
cycling club victor vikrant aalekar amar aalekar birthday story chiplun

चिपळूण (रत्नागिरी) : गेल्या काही आठवड्यांपूर्वी 200 किमीची बीआरएम स्पर्धा पूर्ण केल्यानंतर चिपळूण सायकलिंग क्लबच्या विक्रांत सुनील आलेकर व अमर आलेकर यांनी नेत्रदीपक यश मिळवले आहे. 


विक्रांत आलेकर यांनी 300 किमीच्या स्पर्धेचे अंतर 14.40 तासात पूर्ण केली. या स्पर्धेत त्यांनी पुन्हा एकदा आपल्या सायकलिंगची चमक दाखवून चिपळूण शहराचे नाव उंचावले आहे. ही स्पर्धा पुणे-कराड-पुणे या मार्गावर घेण्यात आली होती. ज्यामध्ये 300 किमीसाठी त्यांना 20 तासाचा कालावधी देण्यात आला होता. स्पर्धेतील प्रकारात 28 सायकलिस्ट सहभागी झाले होते. या सर्वांच्यात चिपळूणकडून विक्रांत सुनील आलेकर यांचा सहभाग होता. स्पर्धेत विक्रांतचे मोठे बंधू अमर सुनील आलेकर यांनीही 200 किमीच्या गटातील स्पर्धेत सहभाग नोंदवला होता. त्यांना 200 किमीचे अंतर 10.35 तासात पूर्ण केले. ज्यामध्ये 16 सायकलिस्ट सहभागी होते. हे दिलेले अंतर 13.5 तासात पूर्ण करायचा कालावधी त्यांच्याकडे होता. 

हेही वाचा- चार खासदारांच्या पक्षाचे अध्यक्ष लोकनेते तर..., भाजप आमदाराची शरद पवार यांच्यावर जोरदार टीका


सायकलिंग क्षेत्रातला मानाचा समजला जाणारा एसआर हा किताब मिळवण्यापासून हे युवक आता फक्त दोनच पावले दूर आहेत. यासाठी त्यांना 400 आणि 600 किमीचे अंतर आगामी काळात होणार्‍या स्पर्धेत पूर्ण करावे लागणार आहे. एसआर किताब मिळवण्यासाठी कालेकर बंधू नियमितपणे सराव करीत आहेत.

संपादन- अर्चना बनगे

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com