वादळानंतरचे संकट: मंडणगडात नुकसान झालेल्या शाळा बेवारसच

cyclone damaged 158 schools in Mandangad taluka ratnagiri
cyclone damaged 158 schools in Mandangad taluka ratnagiri

मंडणगड (रत्नागिरी) : निसर्ग चक्रीवादळामुळे मंडणगड तालुक्‍यातील १५८ शाळांना हानी पोचली. त्यांचे ३ कोटी २८ लाख रुपयांचे नुकसान झाले. यात रत्नागिरी जिल्हा परिषदेच्या ताब्यातील १३४ शाळांच्या इमारती, तसेच माध्यमिक खासगी २४ शाळांचा समावेश आहे. जिल्हा परिषदेच्या २८ प्राथमिक शाळांना इमारतीसाठी ४१ लाख ५४ हजार ९८८ रुपयांचा निधी तातडीची दुरुस्तीकरिता मंजूर केला, मात्र पूर्ण नुकसान झालेल्या शाळांना एकही रुपया दिला नाही.

आंबवली, आतले, गणेशकोंड, आंबवणे बुद्रुक, उन्हवरे, बाणकोट किल्ला (उर्दू) जावळे, धामणी, आतले, कुडुकबुद्रुक बोरीचा कोंड, पडवे नं. १ व तुळशी नं. १ या शाळांना एकही रुपयांचा निधी अद्याप मिळालेला नाही. तालुक्‍यास प्राप्त झालेल्या ४१ लाख ५४ हजार ९८८ रुपयांच्या निधीत पाट, सुर्ले, पन्हळी खुर्द, चिंचाळी, ढांगर, पेवेकोंड, पाचरळ, शेवरे, बोरघर, मालेगाव, वडवली, पालेकोंड, विन्हे, भोळवली, पिंपळगाव, कादवण, नारगोली, जांभूळनगर, देव्हारे, वेरळ, शिरगाव, पिंपळोली, बामणघर, तिडे, तळेघर, गोवले, आंबवणे, मंडणगड या २८ गावांतील जिल्हा परिषद शाळांचा समावेश आहे.


 शाळांच्या तातडीने दुरुस्तीसाठी प्राप्त झालेला निधी ग्रामपंचायतीच्या खात्यात वर्ग केला आहे. शाळा व्यवस्थापन समितीमार्फत थेट शाळेच्या खात्यात वर्ग केला असता तर दुरुस्तीची कामे अधिक जलद गतीने झाली असती, मात्र हा निधी ग्रामपंचायतीस वर्ग करून जिल्हा परिषदेने स्थानिक लोकप्रतिनिधींना खूश करण्याचा प्रयत्न असल्याची चर्चा तालुक्‍यात सुरू आहे. यामुळे दुरुस्ती रखडली आहे.

घोषणेचे नंतर काय झाले 
खासदार सुनील तटकरे यांनी सर्व शाळांना तातडीने निधी उपलब्ध करून देण्याचे आश्वस्त केले होते. या घोषणेचे नंतर काय झाले, असा प्रश्नही उपस्थित केला जात आहे. पंचायत समिती सदस्य नितीन म्हामुणकर यांनी निसर्ग वादळामुळे हानी पोचलेल्या तालुक्‍यातील सर्व शाळांना तातडीने निधी द्यावा, यासाठी निवेदन दिले होते.

शिक्षक संघटनांचे मौन
तालुक्‍यातील विविध शिक्षक संघटना या विषयावर मात्र मौन धरून आहेत. याबाबत पालक वर्गात नाराजी आहे. शिक्षक संघटना आवश्‍यक पायाभूत सुविधांच्या वानवेकडे दुर्लक्ष का करीत आहेत, असा प्रश्न उपस्थित होत आहे.

संपादन- अर्चना बनगे

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com