दाभोळमध्ये दरड कोसळून बालिका जखमी

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 5 जुलै 2017

दाभोळ - येथील ढोरसई भागात आज दरड कोसळून मुग्धा जांभारकर (वय 9) ही बालिका जखमी झाली. तिच्या पायाला दुखापत झाली असून, तिला दापोलीच्या उपजिल्हा रुग्णालयात दाखल केले आहे. हा प्रकार घडला.

दाभोळ - येथील ढोरसई भागात आज दरड कोसळून मुग्धा जांभारकर (वय 9) ही बालिका जखमी झाली. तिच्या पायाला दुखापत झाली असून, तिला दापोलीच्या उपजिल्हा रुग्णालयात दाखल केले आहे. हा प्रकार घडला.

नंदकुमार सखाराम जांभारकर यांच्या घरामागील डोंगरातील दरड सकाळी अकराच्या सुमारास कोसळली. यातील दगड उडून जांभारकर यांच्या घराच्या पडवीतील दरवाजामधून आत आले. त्या वेळी पडवीत हात धुवत असलेल्या मुग्धाच्या पायावर दगड पडल्याने ती जखमी झाली. ढोरसई भाग हा डोंगरपायथ्याशी वसलेला असून येथे एका बाजूला डोंगर व दुसऱ्या बाजूला दाभोळची खाडी आहे. अतिवृष्टीमुळे डोंगरातील सैल झालेली दरड खाली आली. जांभारकर यांच्या घराच्या मागील संरक्षक भिंतही पडली.

ही बातमी कळताच शासकीय अधिकाऱ्यांनी घटनास्थळी येऊन घटनेचा पंचनामा केला आहे. गेल्या वर्षी याच परिसरात भूस्खलन होऊन त्यात तीन घरे व पाच जण गाडले गेले होते.

Web Title: dabhol konkan news child injured by landslide