जांभा दगड वाहतूक करणारे तीन डंपर पकडले

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 6 जून 2017

खनिकर्म विभागाची कारवाई - १ लाख ३६ हजारांचा दंड

दाभोळ - विनापरवाना जांभा दगड व मातीची वाहतूक करणाऱ्या ३ डंपरवर रत्नागिरी येथील खनिकर्म अधिकाऱ्यांनी कारवाई केली. त्यांच्याकडून सुमारे १ लाख ३६ हजारांचा दंड वसूल केला.

रत्नागिरी येथील जिल्हा खनिकर्म विभागाचे निरीक्षण अधिकारी दापोलीकडे येत असताना त्यांना तीन डंपरमधून जांभा दगड व मातीची वाहतूक होत असल्याचे आढळून आले. त्यांनी डंपरचालकाकडे वाहतूक परवान्याची मागणी केली असता तो वाहनचालकांकडे आढळून आला नाही. 

सूरज दिलीप नलावडे यांच्याकडील वाहनातून (जीए-०३-५५३१) ३ ब्रास जांभा दगड, गणेश घोरपडे यांच्याकडील वाहनातून (एमएच-०८-डब्लू-८१६०) अडीच  ब्रास माती व राजेंद्र काशिनाथ चव्हाण यांच्याकडील वाहनातून (एमएच-०८-एच-१८०५) ३ ब्रास मातीची वाहतूक करण्यात येत होती. ही सर्व वाहने दापोली तहसील कार्यालयाच्या आवारात आणण्यात आली होती. तिन्ही वाहनांना सुमारे १ लाख ३६ हजार रुपयांचा दंड करण्यात आला. दंडाची रक्‍कम भरल्यावर ही वाहने सोडण्यात आल्याची माहिती तहसील कार्यालयातून देण्यात आली आहे.

Web Title: dabhol konkan news dumper caught