विहिरीत पडून बिबट्याचा मृत्यू

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 15 जुलै 2017

दाभोळ - दापोली तालुक्‍यातील शिरशिंगे-मराठवाडी येथे किरण जंगम यांच्या विहिरीत सहा वर्षांचा बिबट्या मृतावस्थेत आढळला. वन विभागाच्या अधिकारी व कर्मचाऱ्यांनी बिबट्याला ग्रामस्थांच्या साह्याने विहिरीबाहेर काढले. दापोली येथील वन विभागाच्या कार्यालयाच्या आवारात त्याचे दहन करण्यात आले.

याबाबत परीक्षेत्र वनाधिकारी सुरेश वरक यांनी दिलेल्या माहितीनुसार शुक्रवारी सकाळी शिरशिंगे-मराठवाडी येथील किरण जंगम यांच्या विहिरीत एक बिबट्या मृतावस्थेत आढळला. किरण जंगम यांच्या घराच्या आवारात 25 फूट खोल विहीर आहे. सध्या विहिरीत दहा फुटांहून अधिक पाणी आहे. विहिरीतील पाण्याचा पंप बंद पडल्याने आज सकाळी जंगम यांचे कुटुंबीय विहिरीजवळ गेले असता त्यांना विहिरीत मृत बिबट्या तरंगताना आढळला. मृत बिबट्या नर होता. त्याचे वय सहा असल्याचे वरक यांनी सांगितले. गुरुवारी (ता.13) सायंकाळी किंवा रात्री हा बिबट्या भक्ष्याचा पाठलाग करीत असताना विहिरीत पडला असण्याची शक्‍यता त्यांनी वर्तविली. त्याने पाण्याबाहेर येण्याचे प्रयत्न केले, मात्र त्याला बाहेर पडता आले नाही. परिणामी त्याचा बुडून मृत्यू झाला असावा.

Web Title: dabhol konkan news leopard death in well