जिल्ह्यात धरणांच्या पातळीत घट

- तुषार सावंत
शुक्रवार, 10 मार्च 2017

कणकवली - समाधानकारक पावसानंतर कडाक्‍याची थंडी आणि गेला महिनाभर वाढलेल्या उष्म्यामुळे जमिनीतील पाणीपातळी कमालीची घटू लागली असून जिल्ह्यातील एक मोठा, दोन मध्यम आणि लघु तसेच पाझर तलावातील पाणीसाठा कमालीचा घटू लागला आहे. त्यामुळे यंदा पाणीटंचाईचा सामना करण्याची वेळ येणार आहे. 

कणकवली - समाधानकारक पावसानंतर कडाक्‍याची थंडी आणि गेला महिनाभर वाढलेल्या उष्म्यामुळे जमिनीतील पाणीपातळी कमालीची घटू लागली असून जिल्ह्यातील एक मोठा, दोन मध्यम आणि लघु तसेच पाझर तलावातील पाणीसाठा कमालीचा घटू लागला आहे. त्यामुळे यंदा पाणीटंचाईचा सामना करण्याची वेळ येणार आहे. 

जिल्ह्यात गतवर्षी पावसाने सरासरी गाठली असून थंडीचे प्रमाणही वाढले होते; परंतु गेले काही दिवस उष्णतेचे प्रमाणही वाढल्याने धरणांतील पाणीसाठा कमी झाला असून, सह्याद्रीकडून समुद्राकडे धावणाऱ्या नदी-नाल्यांचे प्रवाहही खंडित झाले आहेत. सह्याद्री पट्ट्यातील नद्यांचे प्रवाह गोठले असून गडनदी पात्रातील कोल्हापूर पद्धतीच्या बंधाऱ्यातील पाणीसाठाही कमी झाला आहे. 

सद्यःस्थितीत धरणांतील पाणीसाठा दशलक्ष घनमीटर तसेच टक्केवारीत असा - 
पाटबंधारे विभाग आंबडपाल उपविभाग, सावंतवाडी यांच्याकडील आडेली उपयुक्त पाणीसाठा १.२८८ (२१.८२ टक्के), आंबोली- १.७२५ (४०.८१ टक्के), चोरगेवाडी - ३.२०० (५१.६६ टक्के), हातेरी - १.९६३ (२६.९० टक्के), माडखोल १.६९०(८०.१२ टक्के), निळेली - १.७४७ (४९.५१ टक्के), ओरोस बुद्रुक - २.४०६ (३९.११ टक्के), सनमटेंब - २.३९० (३८.१२ टक्के), तळेवाडी २.५०४ (४२.९७ टक्के), दाबाचीवाडी - २.४२१ (४५.१५ टक्के), पावशी ३.०३० (४७.५३ टक्के), शिरवल - ३.६८० (४७.२३टक्के), कुळास - १.५०८ (६२.२० टक्के), वाफोली २.३३० (३४.९८ टक्के), कारिवडे - १.४९६ (३७.४७ टक्के), धामापूर - १.१९१ (५० टक्के), हरकूळ खुर्द - १.१०९ (४७ टक्के), ओसरगाव -०.१५९ (१२ टक्के), ओझरम -०.७३९ (४१ टक्के), लोरे - १.४७७ (५६ टक्के), तिथवली - ०.८३७ (५० टक्के), शिरगाव - ०.३०२ (२० टक्के), शिवडाव - १.४६३ (५५.२८ टक्के), नाधवडे - ३.६९६ (७०.८९ टक्के), ओटव - २.९२४ (६२.४९ टक्के), देदोणवाडी - ०.८५३ (८५.०२ टक्के). 
 

कोकणातील प्रकल्प संख्या * आजचा उपयुक्त साठा (द.ल.घ.मी.) *  एकूण साठा * टक्केवारी 
* मोठे प्रकल्प ११ * १७४२ * २५८६ * ७०.७२ 
* मध्यम प्रकल्प ७ * ४८७ * ४९७ * ६३.५५ 
* लघु प्रकल्प ५७ * ५६१ * ५८८ * ४९.६६ 

Web Title: dam water lavel decrease