esakal | काही सुखद ! लाॅकडाऊनमध्ये दामले दाम्पत्यांनी विकसित केला कापडी पिशवीचा ब्रॅंड 
sakal

बोलून बातमी शोधा

Damle Couple Developed  Cloth Bag Brand In Lock Down

लॉकडाउनचा सुरवातीचा काळ मजेत गेला. मेमध्ये खासगी कंपनीतून सेवानिवृत्त होणार असल्यामुळे विचार चालू होतेच. कंपनीत काम करताना तेथे मशीन साफसफाईसाठी कापडी तुकडे यायचे. तेव्हा अशा कापडाच्या तुकड्यांचा उपयोग करता येईल व कापडी पिशव्या शिवण्याचे ठरवले.

काही सुखद ! लाॅकडाऊनमध्ये दामले दाम्पत्यांनी विकसित केला कापडी पिशवीचा ब्रॅंड 

sakal_logo
By
मकरंद पटवर्धन

रत्नागिरी - कोरोना महामारीमुळे झालेले लॉकडाउन आणि सेवानिवृत्तीचा विचार करून कुवारबाव येथील सुधीर दामले व अपूर्वा दामले यांनी "कापडी पिशवी'चा ब्रॅंड विकसित केला आहे. प्लास्टिक पिशवीला उत्तम पर्याय ठरणाऱ्या कापडी पिशव्या म्हणजे आत्मनिर्भर व पर्यावरणपूरक भारतासाठी खारीचा वाटा उचलला आहे. आजवर त्यांनी पाचशेहून अधिक पिशव्या शिवल्या. व्यवसाय म्हणून नव्हे तर फक्त खर्च निघेल एवढ्याच अत्यल्प रकमेत पिशव्यांची विक्री ते करत आहेत. 

या उपक्रमाबद्दल त्यांना सोलापूरच्या आत्मविकास व संशोधन केंद्राने अभिनव कल्पना म्हणून विशेष सन्मानपत्रही दिले. अलीकडे प्लास्टिक पिशव्यांचा वारेमाप वापर होतो पण कापडी पिशव्या वापरल्यास प्लास्टिक पिशव्यांचा वापर खूप कमी करता येऊ शकतो. याकरिता आमचा खारीचा वाटा उचलला असल्याचे दामले यांनी सांगितले. 

लॉकडाउनचा सुरवातीचा काळ मजेत गेला. मेमध्ये खासगी कंपनीतून सेवानिवृत्त होणार असल्यामुळे विचार चालू होतेच. कंपनीत काम करताना तेथे मशीन साफसफाईसाठी कापडी तुकडे यायचे. तेव्हा अशा कापडाच्या तुकड्यांचा उपयोग करता येईल व कापडी पिशव्या शिवण्याचे ठरवले. कापडी पिशव्यांचा प्रचार - प्रसार करण्याचा पर्यावरणपूरक उपक्रमही होईल हा विचार त्यामागे होता, असे दामले म्हणाले. 

घरात आईचे शिलाई मशिन असल्यामुळे लहानपणापासून मशिन चालवायची सवय होती. दिवसाला दहा ते पंधरा पिशव्या होतात. 12 इंच बाय 15 इंचाच्या पिशव्यांचे कटिंग व शिवणकाम घरातच करतो. एका पिशवीत पाच किलो धान्य राहते. सर्व आकारामध्ये कापडी पिशव्या बनवतो. मध्यंतरी बिर्याणीच्या डब्यांसाठी व टीफीनच्या आकारातील पिशव्या दोघांना शिवून दिल्या. 
- सुधीर दामले 

स्वस्तात दिल्याने वापर वाढेल 
कोरोनामुळे आर्थिक संकट आहे. त्यामुळेच पिशव्या कमीत कमी किंमतीत मिळाल्या तर लोकांमध्ये त्या वापरण्याची सवय लागेल. त्यामुळे प्लास्टिकच्या पिशव्यांचा वापर व त्यातून होणारे प्रदूषण, अडचणी कमी होतील, असा विश्‍वास दामले यांनी व्यक्त केला. 
 
 

loading image