भुवडवाडी साकवावरून ग्रामस्थांची जीवघेणी ये-जा

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 29 डिसेंबर 2016

सावर्डे - कापशी नदीवर सावर्डे-भुवडवाडी येथे ग्रामस्थांना ये-जा करण्यासाठी शासकीय विद्यार्थिनी वसतिगृहामागे असलेला लोखंडी साकव धोकादायक झाला असून त्यावरून जीव मुठीत घेऊन ग्रामस्थ ये-जा करीत आहेत. साकवावरील सिमेंट प्लेट तुटलेल्या असल्याने समस्या गंभीर बनली आहे.

सावर्डे पैकी भुवडवाडी ही ४०० ते ४५० लोकसंख्या असलेली वाडी आहे. वाडीतील लोकांच्या जमिनी नदीपलीकडे आहेत. नदीला बारमाही पाणी असते.

पावसाळ्यात तर नदी दुथडी वाहते. नदीच्या एैलतीरावरून पैलतीराकडे जाण्यासाठी या साकवाचा वापर केला जातो; पण ग्रामस्थांची नदीपार करण्याचे साधन असलेल्या साकवाला उभारून सुमारे ३० वर्षे झाली. एकदा बांधल्यानंतर त्याची दुरुस्ती, देखभाल करण्यात न आल्याने साकवावरील लोखंडी अँगल पूर्णपणे सडले आहेत. तसेच त्यावर टाकण्यात आलेल्या सिमेंटच्या प्लेटा तुटल्याने ग्रामस्थांना उड्या टाकत जावे लागते. साकवाची स्थिती अत्यंत दयनीय झाली आहे. पावसाळ्यात या साकवावरून प्रवास करणे म्हणजे मृत्यूच्या खाईत उडी टाकण्याचा प्रकार आहे. ग्रामस्थांनी फुटलेल्या सिमेंट प्लेटांच्या ठिकाणी लाकडाचे ओंडके टाकले आहेत. पावसामुळे कुजलेले लाकूड कधी धोका देईल ते सांगता येत नाही. त्यामुळे या साकवाची तातडीने दुरुस्ती होणे गरजेचे असल्याचे मत ग्रामस्थांनी व्यक्त केले आहे.

Web Title: Dangerous iron bridge

टॅग्स