दापोलीत 150 अनधिकृत खोकी हटविली 

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 17 फेब्रुवारी 2017

नगरपंचायतीची कारवाई : नगरसेवकांची पाठ, खोकेधारक नाराज 
दापोली : शहरातील शासकीय जागेतील अनधिकृत टपऱ्या, शेड यांच्यावर नगरपंचायतीच्या अतिक्रमणविरोधी विभागाने गुरुवारी धडक कारवाई केली. मोहिमेत सुमारे 150 खोकी पाडण्यात आली. त्यामध्ये फळ व्यावसायिक, भाजी विक्रेते, टपऱ्या यांचाही समावेश होता. 

नगरपंचायतीची कारवाई : नगरसेवकांची पाठ, खोकेधारक नाराज 
दापोली : शहरातील शासकीय जागेतील अनधिकृत टपऱ्या, शेड यांच्यावर नगरपंचायतीच्या अतिक्रमणविरोधी विभागाने गुरुवारी धडक कारवाई केली. मोहिमेत सुमारे 150 खोकी पाडण्यात आली. त्यामध्ये फळ व्यावसायिक, भाजी विक्रेते, टपऱ्या यांचाही समावेश होता. 

नगरपंचायतीच्या परीविक्षाधीन मुख्याधिकारी सी. वान्मती यांच्या मार्गदर्शनाखाली कारवाई करण्यात आली. ही कारवाई सलग दोन दिवस सुरू राहणार आहे. मोहिमेंतर्गत शहरातील बस स्थानक परिसर, पोलिस ठाणे मार्ग, गाडीतळ, मच्छी मार्केट परिसर, दाभोळ मार्ग, हर्णै मार्ग आदी भागात आज कारवाई करण्यात आली. 

अनेक राजकीय नेत्यांनी कारवाई टाळण्यासाठी प्रयत्न केले; मात्र मुख्याधिकारी सी. वान्मती यांनी कोणाच्याही दबावाला न जुमानता कारवाई केली. कारवाईमुळे बस स्थानक परिसरात रस्त्याजवळील बाजूपट्टी मोकळी झाली. काही फलकही हटविण्यात आले. दिवसभर सुरू असलेली कारवाई सायंकाळी पाच वाजता थांबविण्यात आली. मोहिमेत जप्त केलेले सामान काळकाई कोंडावर असलेल्या पाण्याच्या टाकीजवळ ठेवण्यात आले आहे. दरम्यान, कारवाई सुरू असताना एकही नगरसेवक फिरकला नाही. धडक मोहिमेत एक जेसीबी, चार ट्रॅक्‍टर, नगरपंचायतीचे कर्मचारी, पोलिस सहभागी झाले होते. पोलिस निरीक्षक डॅनिअल बेन, नायब तहसीलदार श्‍वेता आल्हाट, कर्मचारी दीपक सावंत, पवार, विजय मोहिते, स्वप्नील महाकाळ, मंगेश तांबे उपस्थित होते. 

""प्रशासनाने अयोग्य पद्धतीने कारवाई केली. गरीब व हातावर पोट असलेल्या खोकेधारकांवर कारवाई करण्याअगोदर धनदांडग्यांच्या अनधिकृत इमारतींवर हातोडा चालविण्याची हिंमत प्रशासनाने दाखवावी. त्याची यादी आम्ही प्रशासनाला देऊ.'' 
- भाऊ तांबे, माजी उपनगराध्यक्ष, दापोली  

Web Title: Dapoli illegal stoers construction demolition