दापोलीत नीचांकी 11 अंश तापमान

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 13 डिसेंबर 2016

पर्यटक पाहुणे आणि वाहनांनी किनारे फुलले

दापोली : दापोलीत गेले सलग दोन दिवस पारा 11 अंश सेल्सिअसपर्यंत खाली आला. यावर्षीच्या थंडीच्या मोसमातील नीचांकी तापमानाची नोंद आहे. दापोलीतील थंडी गेल्या दोन दिवसांपासून वाढली आहे. शुक्रवारी (ता. 9) रोजी पारा 11.2 अंश सेल्सिअसपर्यंत घसरला तर, शनिवारी 10 रोजी त्यामध्ये किंचित वाढ होऊन 11.4 इतकी नोंद झाली आहे. रविवारी (ता.11) रोजी पहिल्यांदाच तापमानात 11 अंश सेल्सिअस एवढी घट नोंदवली आहे.

ऑक्‍टोबरच्या शेवटी दापोलीच्या वातावरणात थंडावा जाणवत होता. नोव्हेंबरच्या पहिल्या आठवड्यात सरासरी तापमान 15.7 सेल्सिअस एवढे राहिले. याच महिन्याच्या दुसऱ्या आठवड्यात हवामान विषम स्वरूपाचे होते. या दरम्यान दिवसभर उन्हाचे चटके बसत होते. पहाटे आणि संध्याकाळी वातावरणात गारठा जाणवत होता. याच महिन्याच्या 11 तारखेला सर्वात कमी 11.2 सेल्सिअस तापमानाची नोंद झाली, मात्र त्यानंतर पारा सरासरी 14 सेल्सिअस एवढा स्थिरावला.

या महिन्याचा दुसरा आठवडा आणि जोडून आलेल्या ईदच्या सुटीने दापोलीत पर्यटकांची वर्दळ वाढली आहे. समुद्र पर्यटनाबरोबरच दापोलीतील थंडीचा आस्वाद घेण्यासाठी पर्यटक येत आहेत. गेल्या शनिवारी-रविवारी आलेल्या पर्यटकांची थंडी नसल्याने निराशा झाली. गेले दोन दिवस घसरत्या पाऱ्याने पर्यटक खूश झाले आहेत. तापमानातील घट अशीच सुरू राहिली, तर येत्या विकेंडला येणाऱ्या पर्यटकांना दापोलीच्या थंडीचा आस्वाद घेता येईल किंवा हुडहुडी अनुभवावी लागेल.

Web Title: dapoli records lowest temeperature