दापोलीत पुन्हा हुडहुडी; पारा 11 अंशावर

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 10 डिसेंबर 2016

दरवर्षी डिसेंबरात आम्ही दापोली-गुहागर येथे येतो. दापोलीची थंडी आल्हाहदायक असते. पुणे, नाशिक, कोल्हापूर येथील थंडी बोचरी वाटते. आजपासून थंडी आल्हाहदायक आहे.
- प्रियांका प्रकाश रसाळ, वाशीनाका-कोल्हापूर.

दापोली : दापोलीत गेले दोन दिवस पारा पुन्हा घसरला असून आज 11.2 अंश सेल्सिअसवर आल्याने स्थानिक रहिवासी व पर्यटकांना चांगलीच हुडहुडी भरली होती. नोव्हेंबर महिन्याच्या पहिल्या आठवड्यात दापोलीच्या वातावरणात गारवा जाणवण्यास सुरवात झाली होती. 11 नोव्हेंबरला सर्वात कमी म्हणजे 11.2 सेल्सिअस तापमानाची नोंद झाली होती. त्यानंतर पारा सरासरी 14 सेल्सिअसवर स्थिरावला होता. या महिन्याच्या सुरवातीला थंडी गायब झाली होती; मात्र गेले दोन दिवस पुन्हा पारा घसरण्यास सुरवात झाल्यामुळे बागायतदार आणि पर्यटक खूष झाले आहेत.

सोमवारी (ता. 5) किमान तापमान 20 सेल्सिअस, तर मंगळवारी 18 सेल्सिअस एवढे होते. दापोलीच्या तापमानाच्या तुलनेत हे किमान तापमान जास्त होते; मात्र त्यानंतर बुधवारपासून किमान तापमानात घट होण्यास सुरवात झाली. बुधवारी किमान तापमान 12.8, तर गुरुवारी 12 सेल्सिअस राहिले. याचवेळी कमाल तापमानात 5 तारखेला 33 सेल्सिअस, तर 6 ला 32.4 सेल्सिअस नोंद झाली. या दोन्ही दिवशी दापोलीच्या वातावरणात प्रखर उन्हाचा त्रास जाणवत होता. किमान आणि कमाल तापमानात 20 अंश सेल्सिअस एवढा झाल्याने विषम हवामानाचा अनुभव दापोलीकर घेत आहेत.

दापोलीत पर्यटकांची वर्दळ वाढली असून समुद्र पर्यटनाबरोबरच दापोलीतील गुलाबी थंडीचा आस्वाद घेण्यासाठी पर्यटक येत आहेत.

दापोलीतील पाच दिवसांतील तापमान
तारीख कमाल किमान
5 डिसेंबर 33.0 20.0
6 डिसेंबर 32.4 18.0
7 डिसेंबर 32.8 12.8
8 डिसेंबर 31.0 12.0
9 डिसेंबर 32.8 11.2

दरवर्षी डिसेंबरात आम्ही दापोली-गुहागर येथे येतो. दापोलीची थंडी आल्हाहदायक असते. पुणे, नाशिक, कोल्हापूर येथील थंडी बोचरी वाटते. आजपासून थंडी आल्हाहदायक आहे.
- प्रियांका प्रकाश रसाळ, वाशीनाका-कोल्हापूर.

थंड हवेचे ठिकाण म्हणून महाबळेश्वर प्रसिद्ध आहे, तरी जंगलतोड व प्रदूषणाने तेथे प्रसन्नता हरवत आहे. दापोलीत सकाळच्या शांत वातावरणात फिरताना खूप प्रसन्न वाटते. थंडी वाढल्यास मुक्कामही वाढवणार.
- श्‍याम काटकर, पुणे

Web Title: dapoli shivers at 11 degree